३० वर्षानंतर नवरात्रीला शुभ राजयोग घडल्याने ‘या’ राशींना होणार प्रचंड धनलाभ, शनिदेवाच्या कृपेने मिळू शकते अमाप संपत्ती

दरवर्षी अश्विन महिन्यात शारदीय नवरात्री साजरी केली जात असून माता दुर्गेचे भक्त या नवरात्रीची आतुरतेने वाट पाहत असतात. हिंदू धर्मात नवरात्री अर्थात् घटस्थापने दरम्यान संपूर्ण देशभरात देवीची पूजा केली जाते. नवरात्री दरम्यान नऊ दिवस उपवास व देवीची पूजा अर्चना करतात. यावर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात १५ ऑक्टोबरपासून होणार असून २४ ऑक्टोबर २०२३ पर्यंत चालणार आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार, यंदाच्या शारदीय नवरात्रीला अनेक राजयोग तयार होत आहेत. ३० वर्षानंतर शनिदेव आपल्या स्वराशी कुंभ राशीत विराजमान होणार आहेत. हा योगायोग ३० वर्षांनंतर घडत आहे. वास्तविक, शनिदेव अडीच वर्षात आपली राशी बदलतात, म्हणजेच अडीच वर्षे एका राशीत राहिल्यानंतर ते दुसऱ्या राशीत जातात. याचबरोबर बुधदेव आणि सुर्यदेव कन्या राशीत प्रवेश केल्याने बुधादित्य राजयोग तयार होत आहे. त्याचबरोबर बुधदेव आपल्या स्वराशीत राहून भद्र राजयोग तयार करणार आहेत. तर शनिदेव स्वराशीत असल्याने शश राजयोग तयार होत आहे. या राजयोगामुळे काही राशींच्या लोकांसाठी शारदीय नवरात्री सुख समृध्दी, यश घेऊन येणारी ठरु शकते. चला तर पाहूया कोणत्या आहेत या राशी…

शारदीय नवरात्रीला ‘या’ राशींचे नशीब पालटणार ?
वृषभ राशी
बुधादित्य राजयोग, भद्र राजयोग बनल्याने वृषभ राशींच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. या काळात माता दुर्गेच्या कृपेने तुम्हाला करिअर आणि व्यवसायात बंपर लाभ होण्याची शक्यता आहे. कोर्टकचेरीत अडकलेली प्रकरण या योग काळात मार्गी लागू शकतात. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनातही आनंदच आनंद राहू शकतो. घरात सुख, शांती आणि समृद्धी राहू शकते.

मकर राशी
मकर राशीतील लोकांसाठी हे राजयोग लाभदायी ठरु शकतात. नोकरदार लोकांचे पद आणि प्रतिष्ठा वाढू शकते. तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना नफा मिळू शकतो. गुंतवणुकीतून मोठा पैसा मिळण्याची शक्यता आहे. इतरांच्या मदतीने लाभाच्या संधी मिळू शकतात. जे अविवाहित आहेत, त्यांना काही चांगली बातमी मिळू शकते.

तूळ राशी
शारदीय नवरात्री तूळ राशींच्या लोकांसाठी लॉटरीसारखे असू शकते. या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. त्यामुळे नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. करिअर आणि व्यवसायासाठी हा काळ चांगला राहू शकतो. नवीन नोकरीच्या ऑफर येऊ शकतात. तसेच नोकरीत प्रमोशन मिळू शकते. राजकारणाशी संबंधित लोकांना मोठी जबाबदारी मिळू शकते.

Leave a Comment