मित्रानो, वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्र यांची स्थिती ही अतिशय महत्त्वाची असते. या ग्रह आणि नक्षत्राच्या हालचालीतून मानवी जीवनावर परिणाम होत असतो. चंद्र हा सर्वात लवकरच आपली स्थिती बदलतो. म्हणजे तो एका ग्रहातून दुसऱ्या ग्रहात प्रवेश करतो. या घटनेला ज्योतिषशास्त्रात ग्रहांचं गोचर असं म्हणतात. तर चंद्र हा अडीच दिवसात आली स्थिती बदलतो.
तर शनिदेव हा कर्माचा दाता सर्वात संथ गतीने आपली स्थिती बदलत असतो. सध्या शनिदेव कुंभ राशीत म्हणजे स्वगृही असून तो अडीच वर्ष एका राशीत विराजमान असतो. सध्या शनिदेव प्रतिगामी अवस्थेत भ्रमण करत असल्यामुळे 15 ऑक्टोबरपर्यंत 5 राशींच्या लोकांना धनलाभ, मान सन्मान मिळणार आहे.
तूळ राशी
या राशीच्या लोकांसाठी प्रतिगामी शनि अनुकूल असणार आहे. या काळात आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होणार आहे. करिअरच्या क्षेत्रात तुम्ही झेंडा रोवणार आहात. या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचं पूर्ण फळ मिळणार आहे.
धनु राशी
या राशीच्या लोकांसाठी शनीची प्रतिगामी चाल तुम्हाला फलदायी ठरणार आहे. या काळात या राशीच्या नोकरदार लोकांना चांगली बातमी मिळणार आहे. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना आनंदाची बातमी मिळणार आहे. अगदी तुम्हाला पदोन्नतीदेखील मिळण्याची शक्यता आहे.
मेष राशी
या राशीच्या लोकांसाठी शनीची प्रतिगामी चाल खूप जास्त भाग्यशाली ठरणार आहे. नवीन काम किंवा नवीन योजना राबवण्यासाठी ही उत्तम संधी चालून आली असल्याने हा काळ तुमच्यासाठी भाग्यशाली असणार आहे. प्रतिगामी शनीच्या कृपेने या राशीच्या लोकांना करिअरमध्ये नवीन संधी मिळणार आहेत. अनपेक्षित धनलाभ होणार आहे.
मिथुन राशी
प्रतिगामी शनि या राशीच्या लोकांसाठी आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. 15 ऑक्टोबरपर्यंत या लोकांना भरपूर यश, धनलाभ आणि मान सन्मान मिळणार आहे. परदेश प्रवासाचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांची स्वप्ने या काळात पूर्ण होणार आहेत.
सिंह राशी
प्रतिगामी शनि या राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये प्रगतीची घेऊन आला आहे. या काळात तुम्हाला करिअरशी संबंधित खूप चांगल्या संधी मिळणार आहेत. नोकरदार लोकांना यशासोबत मेहनतीचं फळं मिळणार आहे. तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे.