वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह विशिष्ट वेळी आपली स्थिती बदलतो. त्याचा प्रभाव सर्व राशींच्या लोकांच्या जीवनावर शुभ आणि अशुभ स्वरूपात दिसून येतो. ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला ग्रहांचा राजकुमार म्हणतात. बुध ग्रह ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्वाचा आहे कारण हा ग्रह बुद्धिमत्ता, संवाद, वाणी आणि तर्कशक्तीचा कारक मानला जातो. बुध ग्रह १ ऑक्टोबरला स्वरास असलेल्या कन्या राशीत प्रवेश करणार आहे आणि कन्या राशीमध्ये बुध आणि सूर्य आधीपासूनच आहेत.
यामुळे कन्या राशीत बुधाच्या प्रवेशामुळे सूर्य, बुध आणि मंगळाच्या संयोगाने त्रिग्रही योग तयार होईल. कन्या राशीत त्रिग्रही योग तयार होणे काही राशींच्या लोकांसाठी शुभ परिणाम घेऊन येणारे ठरु शकते. पाहूयात कोणत्या आहेत या राशी…
‘या’ राशींना मिळणार अपार पैसा?
कन्या राशी
कन्या राशींच्या लोकांसाठी त्रिग्रही योग खूप फायदेशीर ठरु शकतो. हा त्रिग्रही योग कन्या राशीतच तयार होणार असल्याने या राशीतील मंंडळींना चांगलाच लाभ मिळण्याची शक्यता आहे. या काळात व्यवसायातही अपेक्षित लाभ होऊ शकतो. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होऊ शकतात. काही जुनी प्रकरणं मार्गी लागू शकतात. हा योग लेखन आणि संवाद क्षेत्राशी संबंधित लोकांना विशेष लाभ देऊ शकतो.
धनु राशी
त्रिग्रही योग तयार झाल्याने धनु राशीच्या लोकांना अनुकूल परिणाम मिळू शकतात. ज्या कामात हात घालाल त्यात अपेक्षित यश मिळू शकतो. तसेच सध्या करत असलेल्या नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती आणि चांगली पगारवाढ मिळू शकते. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. घरात आनंदाची बातमी तुम्हाला मिळू शकते. मानसिक सुख शांती तुम्हाला लाभू शकते.
मकर राशी
त्रिग्रही योग मकर राशीच्या लोकांसाठी सुखाचे दिवस घेऊन येणारा ठरु शकतो. तुम्हाला शेअर बाजार किंवा सोने गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. तुमचं बँक बलेन्स वाढण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर चांगल्या संधी मिळू शकतात. नवीन कामाची संधी तुम्हाला मिळू शकते. या काळात आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे.