नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रांनो, एका आठवड्यामध्ये एकूण सात वार असतात. ते सात वार कोणत्यातरी ग्रहाशी संबंधित असतात. प्रत्येक वाराचे एक विशिष्ट महत्व असते. प्रत्येक वाराला वेगवेगळ्या देवी देवतांची उपासना केली जाते. प्रत्येक वाराचे काही नियम आहेत. नियमाप्रमाणे वागले तर त्याचे शुभ फळ आपल्या मिळत असतात. या लेखामध्ये आपण गुरुवार विषयी माहिती जाणून घेणार आहोत.
गुरुवार हा स्वामींचा आवडता वार मानला जातो. या दिवशी स्वामींची विशेष अशी पूजा केली जाते. त्यांचे विशेष अशी आराधना केली जाते. त्यांना विशेष असे नैवेद्य दाखवला जाते व विशेष असे मंत्रजप देखील केला जातो. आरती देखील म्हटले जाते. गुरुवारी 21 वेळेस जर आपण हा मंत्र बोलला तर स्वामींचा आशीर्वाद नक्कीच आपल्याला मिळेल. हा मंत्र कोणता? याची संपूर्ण माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
गुरूवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी पूजेच्या वेळेस हातपाय होऊन देवघरासमोर बसावे. देवाजवळ दिवा लावावा. अगरबत्ती लावावी. हात जोडून स्वामींना आपल्या घरातील सुख-समृद्धीसाठी, बरकतीसाठी, दुःख दूर होण्यासाठी प्रार्थना करावी.त्यानंतर “ओम ओंकारवासिने नमः” अशा या मंत्राचा जप 21 वेळेस करावा.
हा मंत्र जाप करत असताना मना मध्ये कोणत्याही प्रकारची इच्छा न बाळगता निस्वार्थ मानाने या मंत्राचे जप करावे. अत्यंत मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने या मंत्राचा जप करावा. कारण कोणत्याही सेवेचे फळ हे जर आपण निस्वार्थ मनाने सेवा केली असेल तरच मिळत असते. कोणत्याही स्वार्थी भावनेने मनामध्ये इच्छा बाळगून जर आपण सेवा केली तर त्याचे फळ आपल्याला मिळत नाही.
हा मंत्र जप तुम्ही गुरूवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी एकवीस वेळेस करावा. नक्की तुम्हाला त्याचे फळ मिळेल. स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. स्वामींची कृपादृष्टी तुमच्याबरोबर तुमच्या घरावर होईल. स्वामी तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढतील. तुमच्या घरावर कोणत्याही प्रकारचे संकट येऊ देणार नाहीत. घरामध्ये सुख शांती निर्माण होईल. धनधान्य मध्ये बरकत होईल. तुम्ही देखील हा उपाय करून बघा. नक्कीच मला त्याचा फायदा झालेला दिसून येईल.
अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.