मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक सण उत्सव आपण अगदी आनंदाने साजरी करीत असतो. तर अनंत चतुर्थी दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन झाल्यानंतर पितृपक्ष सुरू होतो आणि हा पितृपक्ष 15 दिवसांचा असतो. या पितृपक्षांमध्ये श्राद्ध करण्याची विधी असते. म्हणजेच आपल्या घरातील मृत झालेल्या व्यक्तींचे श्राद्ध केले जाते. म्हणजेच त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी तसेच आपल्या घरामध्ये सुख शांती नांदावी त्यांचा कृपाशीर्वाद रहावा यासाठी पितृपक्षांमध्ये श्राद्ध करण्याची विधी ही पूर्वीपासून चालत आलेली आहे.
तर पितृपक्ष हा अनंत चतुर्थी झाल्यानंतर सुरू होतो आणि तो पंधरा दिवसांचा पितृपक्ष असतो. तर हा पितृपक्ष सुरू होण्याआधी तुम्हाला अशी काही कामे करायचे आहेत ज्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागणार नाही किंवा आपल्या जीवनामध्ये दुःख देखील येणार नाही आणि आपले पितृ देखील आपल्यावरती खुश होतील आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देतील.
म्हणजेच आपण दसऱ्यामध्ये किंवा दिवाळीमध्ये आपले घर स्वच्छ करून घेतो. त्याप्रमाणे तुम्ही पितृपक्ष सुरू होण्याआधी आपले घर हे स्वच्छ करून घ्यायचे आहे. एखादे जाळे वगैरे आपल्या घरामध्ये असेल तर ते काढून घ्यायचे आहे.
व्यवस्थित आपले घर स्वच्छ करायचे आहे. तसेच आपल्या घरातील काही अडगळीचे सामान असेल हे देखील सामान आपण घरातून बाहेर काढायचे आहे. भांडी धुवून घ्यायची आहेत त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये आपण गोमूत्र शिंपडून आपले घर हे शुद्ध करायचे आहे. असे केल्याने आपले पितृ आपल्यावर खुश होतात.
म्हणजेच या पितृपक्षामध्ये आपल्या घरातील जे काही मृत व्यक्ती असतात हे आपल्या घरामध्ये येत असतात ते कोणत्याही रूपामध्ये आपल्या घरामध्ये येत असतात. त्यामुळे तुम्ही आपले घर हे स्वच्छ करायचे आहे म्हणजे त्यांना जेवढे प्रसन्न करता येईल तेवढे प्रसन्न करायचे आहे.
म्हणजेच या पितृपक्षामध्ये तुम्ही पंधरा दिवस दररोज न चुकता कावळ्याला आणि कुत्र्याला चपाती किंवा भाकरी घालायची आहे. म्हणजेच जेवण बनविताना पहिली एक चपाती कावळ्याला तसेच कुत्र्याला आपल्याला काढून ठेवायची आहे. असे पंधरा दिवस तुम्ही करायचे आहे. यामुळे देखील आपल्या पितरांचा आशीर्वाद आपणाला प्राप्त होतो.
जर मित्रांनो तुम्ही देखील पितृपक्ष सुरू होण्याआधी आपल्या घरातील अडगळीचे सामान बाहेर काढायचे आहे. तसेच आपले घर स्वच्छ करायचे आहे आणि आपली जी घरातील भांडी असतील ही भांडी धुवून घ्यायची आहेत आणि आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडून घ्यायचे आहे. यामुळे पितरांचा शुभ आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो.