मित्रानो आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक सण उत्सव अगदी आनंदाने साजरे केले जातात. आपण सर्वजण गणपती बाप्पाच्या स्वागताची तयारी तर आपण जयत करतो. गणपतीचा पाहुणचार देखील आपण जोरात करतो. अनेकांच्या घरी पाच, सात, अकरा दिवसांचा गणपती असतो. अनेक मंडळामध्ये खूप मोठमोठे गणपती बसवले जातात. अनंत चतुर्थीला गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते.
तर अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन करताना आपण दोन शब्द आपण म्हणाचे आहेत. गणपती बाप्पाचे विसर्जनाच्या वेळेला हे दोन शब्द आपण म्हनायला पाहिजेत. कुठल्या आहे ते दोन शब्द चला जाणून घेऊया.
गणपती बाप्पा हे आपल्या सर्वांचेच आवडते दैवत आहे. अगदी लहान मुलांपासून वृद्ध माणसांपर्यंत सुद्धा गणपती बाप्पाच्या प्रेमामध्ये सर्वच बुडालेले दिसून येतात. पण गणपती बाप्पाचा विसर्जन करताना दोन शब्दांचा उच्चार करावा अस शास्त्र सांगत. पप्पाला निरोप देताना बाप्पाची यथासांग पूजा करा त्याला प्रिय असलेल्या मोदकांचा नव्हे तर दाखवून तो प्रसाद सर्व भाविकांना वाटा.
बाप्पाचे विसर्जन करण्याआधी बाप्पाच्या सानिध्यात काही काळ शांत बसून ‘ॐ गण गणपतये नमः’ या मंत्राचा जप करा. या मंत्राचा जप करून झाल्यावर काही मंत्र आहेत जे मंत्र म्हणत तुम्हाला पप्पाला दुर्वांची जुडी व्हायची आहे. ते मंत्र याप्रमाणे ॐ गणाधिपाय नमः ॐ उमापुत्राय नमः ॐ विघ्ननाशनाय नमः ॐ विनायकाय नमः ॐ ईशपुत्राय नमः ॐ सर्वसिद्धीप्रदाय नमः ॐ एकदन्ताय नमः ॐ इभवक्त्राय नमः ॐ मुषकवाहनाय नमः ॐ कुमारगुरवे नमः या प्रकारे मंत्र म्हटल्यानंतर श्री गणेशाची आरती करावी.
विसर्जनाच्या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा एकदा आरती करा आणि श्री गणेशाच्या मूर्तीला कुठेही धक्का लागणार नाही. मूर्तीचा अपमान होणार नाही याची काळजी घ्या. नंतर मूर्तीचे विसर्जन करा आणि विसर्जन करण्याआधी विसर्जनाचा मंत्र म्हणायला विसरू नका.
तो मंत्र याप्रमाणे
यातुं देवगणा:सर्वे पुजामादाय पार्थिविम
इष्टकामप्रसिध्यर्थ पुनरागमच
असा मंत्र म्हणून मूर्तीला अक्षदा अर्पण कराव्यात. म्हणजे पूर्वी प्राणप्रतिष्ठाने आलेल दैवत विसर्जित होत.
त्यानंतर मूर्ती स्थिर आसनावर थोडी पुढे सरकून ठेवावी आणि मग गणेशाच वाहत्या पाण्यात विसर्जन कराव. यावेळी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करायला विसरू नये. काळानुसार सगळ्यांनाच वाहत्या पाण्यात गणेशाचे विसर्जन करणे शक्य नसतात अशावेळी जर तुमची मूर्ती शाडूची किंवा मातीची असेल तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा विसर्जन करू शकता.
घरच्या घरी मोठा टप किंवा बादली किंवा घंगाळ घ्या. त्यामध्ये बाप्पाला विसर्जित करण्यापूर्वी स्वच्छ पाणी भरून त्यामध्ये हळदी कुंकू फुलांच्या पाकळ्या गंगेचे पाणी मिसळून ठेवा. गणेशाची मूर्ती तीन वेळेस पाण्यात भिजवून नंतर पूर्ण मूर्ती बुडवा. गणेश विसर्जनानंतर पाठाची पुन्हा आरती करून नैवेद्य आणि प्रसादाचे वाटप करून श्री गणेशाला अखेरचा निरोप द्या. बाप्पाला निरोप देताना दही भाताचा नैवेद्य शिदोरी म्हणून देण्याची प्रथा आहे.