मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण उत्सव अगदी आनंदाने साजरे करत असतो. आपापसातील मतभेद दूर करून सर्वजण या सण उत्सवांमध्ये सहभागी होत असतात. तर गणपती उत्सव हा हिंदू धर्मामध्ये खूपच मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन देखील होते. तसेच अनेक घरांमध्ये दीड दिवसांचा गणपती तर काही घरांमध्ये पाच दिवसाचा, सात दिवसाचा गणपती असतो आणि ज्या त्या दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन देखील केले जाते.
अनेक मंडळामध्ये मोठमोठे गणपती बसवले जातात आणि अनंत चतुर्थीच्या दिवशी या बापांचे विसर्जन केले जातात. अनेक जण आपल्या घरातील बाप्पांचे देखील अनंत चतुर्दशीला विसर्जन करीत असतात. तर येणाऱ्या गुरुवारी म्हणजेच 28 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे आणि या अनंत चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांच्या कानामध्ये हा मंत्र जर बोलला तर यामुळे तुमच्या इच्छा देखील पूर्ण होतात.
म्हणजेच तुम्ही आपल्या इच्छा गणपती बाप्पांच्या कानामध्ये सांगायचे आहेत. तर अनंत चतुर्थीच्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून आपल्या देवघरातील दिवा अगरबत्ती करायची आहे. देवपूजा करायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांच्या उजव्या किंवा डाव्या कानामध्ये आपली इच्छा बोलायची आहे आणि त्यानंतर हा मंत्र बोलायचा आहे.
हा मंत्र तुम्ही एक वेळेस किंवा अकरा वेळेस बोलू शकता तो मंत्र काहीसा असा आहे
ओम गण गणपतेय नम:
हा मंत्र तुम्ही अगदी मनोभावेने श्रद्धेने बोलायचं आहे. यामुळे तुमच्या इच्छा गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करतील. तसेच तुमच्या घरातील गणपती बाप्पांचे विसर्जन झाले असेल तर तुम्ही मंडळातील गणपतीच्या कानामध्ये देखील आपली इच्छा बोलू शकता आणि ही इच्छा तुम्ही अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या कानामध्ये बोलायचे आहे आणि हा मंत्र एक वेळेस किंवा अकरा वेळेस बोलायचं आहे.
यामुळे तुमच्या इच्छा गणपती बाप्पांपर्यंत पोहोचतील आणि त्या इच्छा गणपती बाप्पा पूर्ण देखील करतील. तर असा हा प्रभावशाली मंत्र तुम्ही अवश्य गणपती बाप्पांच्या कानामध्ये अनंत चतुर्थीच्या दिवशी अवश्य बोला.