हे संकेत तुम्हाला मिळत असतील तर समजून जा कुलदेवता तुमच्या पाठीशी आहे

मित्रांनो आपल्या प्रत्येकाचेच कोणते ना कोणते कुलदैवत हे असते. म्हणजेच कुलदेवता आणि कुलदेवी ही प्रत्येकाची असते आणि आपण दरवर्षी कुलदेवतांचे दर्शन घेण्यासाठी त्या त्या तीर्थक्षेत्री जात असतो आणि त्यांचा कृपाशीर्वाद व्हावा यासाठी आपण पूजा विधी देखील करीत असतो. तर आज मी तुम्हाला असे काही संकेत सांगणार आहे. या संकेतांवरून तुम्ही समजून जाल की कुलदेवतेचा आशीर्वाद तुमच्यावर आहे म्हणजेच आपल्यावर कुलदेवता ही प्रसन्न झालेली आहे.

प्रत्येकाचे कूलदैवत वेगवेगळे असते. तर कुलदेवतेचा वार देखील हा वेगवेगळा असतो. तर मित्रांनो हे जे काही संकेत आहेत या संकेतावरून तुम्ही नक्कीच समजून जायचे आहे की कुलदेवता आपल्यावर प्रसन्न आहे. कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्या कुटुंबीयांवर आहे.

तर मित्रांनो तुम्हाला जर स्वप्नामध्ये आपल्या कुलदेवतेचे दर्शन झाले मग ते स्वप्न कोणत्याही प्रकारची असो परंतु त्या स्वप्नांमध्ये तुम्हाला कुलदेवतेचे दर्शन झाले तर त्या वेळेला तुम्ही समजून जा की कुलदेवता आपल्यावर प्रसन्न आहे. तसेच तुम्ही ज्या वेळेस देवपूजा करत असता आणि त्यावेळेस तुम्ही आपल्या कुलदेवतेला वाहिलेले फुल तुमच्यासमोरच अचानक खाली पडले असेल तर त्यावेळेस तुम्ही समजून जा की कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्या कुटुंबीयांवर सदैव आहे.

तसेच मित्रांनो तुम्हाला अनेक वेळा कुलदेवतेचा फोटो जिथे जाल तिथे आपल्या डोळ्यासमोर सतत उभा राहत असेल तसेच एखादा आपल्या कुलदेवतेचा भक्त जर आपल्याला आपल्या डोळ्यासमोर दिसत असेल किंवा नामस्मरण आपल्या कुलदेवतेचे करत असताना जर आपणाला सतत आपल्या डोळ्यासमोर उभे राहत असेल तर त्यावेळेस देखील तुम्ही समजून जा की कुलदेवता आपल्यावर प्रसन्न झालेली आहे.

तसेच कुलदेवतेचा जो काही भंडारा असेल किंवा गुलाल असेल तर तो तुम्ही एका डब्यामध्ये भरून ठेवलेला असता तो काही केल्याने संपत नसेल आणि किंवा त्या गुलालावर किंवा भंडाऱ्यावर वेगवेगळया प्रकारचे आकार उटच असतील म्हणजेच आपल्या कुलदेवतेचा जो वार आहे या वारी जर असे आकार उठत असतील तर तुम्ही त्यावेळेस समजून जा की कुलदेवता ही आपल्यावर प्रसन्न झालेली आहे.

तसेच तुम्ही कुलदेवतेचे दर्शन करायला गेल्यानंतर तुम्हाला तेथे दिलेल नारळ तुम्ही घरी आणल्यानंतर तो तुम्ही आपल्या कलशावर स्थापन केला असेल आणि त्या कलशाला कोंब आला असेल आणि त्यातून पाणी बाहेर पडत असेल तरीदेखील तुम्ही समजून जा की कुलदेवता आपल्यावर प्रसन्न झालेली आहे.

म्हणजेच दरवर्षी तुम्ही तीर्थक्षेत्री गेल्यानंतर तुम्ही तेथून नारळ घेऊन येता आणि प्रत्येक वर्षी नारळ कलशावर पुजल्यानंतर त्याला कोंब येत असेल तर त्यावेळेस तुम्ही नक्की समजून जा की कुलदेवता ही आपल्यावर प्रसन्न आहेत.

तर वरील सांगितलेले हे संकेत जर तुम्हाला देखील मिळत असतील तर त्यावेळेस तुम्हाला कुलदेवतेचा आशीर्वाद मिळालेला आहे हे नक्कीच समजून जा. म्हणजे कूल देवतेचा आशीर्वाद आपल्यावर आहे ती आपल्यावर प्रसन्न झालेली आहे हे मात्र नक्की.

Leave a Comment