ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह गोचरमुळे शुभ आणि अशुभ योग तयार होत असतात. 12 राशींच्या जन्मकुंडलीतून भविष्याचा अंदाज सांगितला जातो. येत्या काही दिवसांमध्ये गृहलक्ष्मी योग काही राशींच्या कुंडलीत तयार होणार आहे. या योगामुळे लक्ष्मी माता तुमचं दार ठोठवणार आहे. त्यामुळे घरात सुख, शाती आणि ऐश्वर्या नांदणार आहे.
मेष राशी
या योग काळात तुमची अध्यात्मात रुची वाढणार आहे. पूजा आणि धार्मिक कार्यात तुमचा रस वाढणार आहे. काही गैरसमज आणि सततचे वाद कौटुंबिक वातावरण निराशाजनक करणार आहे. ही परिस्थिती तुम्हाला तणावग्रस्त बनवणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या सहकार्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांशी वाद टाळा. कामासाठी तुम्हाला बाहेरगावी जावं लागणार आहे. तुमच्या जोडीदाराच्या पाठिंब्याने तुम्हाला सुख लाभणार आहे.
वृषभ राशी
गृहलक्ष्मी योगामुळे तुमच्या पद आणि प्रतिष्ठा लाभणार आहे. वडिलोपार्जित गोष्टीतून तुम्हाला लाभ होणार आहे.. ज्येष्ठांचे सहकार्य लाभणार आहे. प्रशासकीय बाबी उत्तम होणार आहे. कुटुंबाशी जवळीक या काळात वाढणार आहे. चैनीच्या वस्तूंकडे लक्ष द्या.
सिंह राशी
कामाच्या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या अधिकृत क्षेत्रात बदल होणार आहे. यातून तुम्हाला फायदा होणार आहे. गृहलक्ष्मी योगामुळे प्रगतीचे अनेक मार्ग खुले होणार आहे. तुमच्या जोडीदारासोबत सुरू असलेली समस्या संपणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. कारण तुमची बढती पाहून तुमचे सहकारी नाराज होणार आहे. अविवाहित लोकांसाठी विवाहाचे प्रस्ताव येणार आहे.
वृश्चिक राशी
ऑफिसमध्ये तुम्हाला जबाबदारीचे काम मिळणार आहे. यातून तुम्हाला फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ असणार आहे. तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहे. व्यवसायानिमित्त परदेशात जाण्याचे योग आहेत. तुमचा प्रवास सुखकर होणार आहे. मुलांकडून तुम्हाला आनंदाचा अनुभव मिळणार आहे.