गणरायासह लक्ष्मीकृपेने तुम्हीही व्हाल श्रीमंत! ‘या’ राशींच्या लोकांची होणार भरभराट

मित्रानो, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला म्हणजेच गणेशोत्सवला प्रारंभ झाला आहे. घरोघरी, मंडळांमध्ये लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे. यंदाचा गणेशोत्सव ग्रहमानानुसार सुद्धा खास असणार आहे कारण तब्बल ३०० वर्षांनी गणेश चतुर्थीला ब्रम्ह व शुक्ल योग सुद्धा तयार झाले आहेत. याशिवाय यंदाची गणेश चतुर्थी ही स्वतः बाप्पाचा लाडका वार म्हणजेच मंगळवारीच जुळून आली आहे. या एकूण योगायोगांमुळे आजपासून काही राशीच्या नशिबात सुखाचे चांदणे पसरणार असल्याचे ज्योतिषतज्ज्ञ सांगतात. नेमक्या या राशी कोंणत्या व त्यामध्ये तुमच्या राशीचा समावेश आहे का हे पाहूया..

वृषभ रास
तुम्हाला करिअरमध्ये गरुडझेप घेण्याची संधी गवसणार आहे. नोकरीत तुमची पदोन्नती व पगारवाढ होण्याची चिन्हे आहेत. तसेच प्रेम नशिबात आहे. तुमचे अडकलेले काम विना विलंब पूर्ण होऊ शकते. एखाद्या नव्या गोष्टीची सुरुवात होण्यासाठी अत्यंत लाभदायक कालावधी आहे.

मिथुन रास
मिथुन राशीवर यंदा अगोदरच शनी देवाची कृपादृष्टी आहे अशातच आता श्रीगणेशाच्या साथीने तुमचे भले होऊ शकते. तुम्हाला वैवाहिक आयुष्यातील कटुता घालवण्याची संधी मिळेल. तुमच्या कुंडलीत येत्या काळात संतती सुख लिहिलेले आहे. जास्त भावुक होऊन निर्णय घेऊ नका.

कन्या रास
सरकारी कामांना वेग येईल ज्यामुळे तुमचा आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहेत. अडकून पडलेले पैसे परत मिळतील. आर्थिक कक्षा रुंदावू शकतात. कुटुंबाची साथ लाभेल. सर्दी- खोकल्यामुळे त्रस्त राहाल पण कामं अडून राहणार नाहीत.

वृश्चिक रास
मानसिक सुख शांतीचा हा कालावधी आहे त्यामुळे रोजच्या कंटाळवाण्या आयुष्यात ऊर्जा आल्याचे जाणवेल. नव्या नोकरीची संधी मिळू शकते. घरी हसते खेळते वातावरण राहू शकते. अर्थाजनाच्या बाबत समस्या दूर होतील.

धनु रास
कामाचा दबाव घेणे टाळा अन्यथा मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते. तुम्हाला शेअर बाजार किंवा सोने खरेदीत गुंतवणूक केल्याने लाभ होऊ शकतात. आर्थिक बाजू भक्कम करताना मनाचा समतोल राखणे अत्यंत आवश्यक ठरेल.

कुंभ रास
कामाच्या ठिकाणी एखादा मोठा प्रोजेक्ट तुमच्या पुढाकाराने पूर्ण होऊ शकतो. वेळेत कामे पूर्ण झाल्याने तुमची गडबड- गोंधळाची मानसिकता दूर होईल. तुमच्या खासगी आयुष्यात व कामामध्ये संतुलन राखणे अत्यंत आवश्यक आहे. जोडीदाराच्या मदतीने तुमचे आर्थिक बळ वाढू शकते.

Leave a Comment