दररोज दहा दिवस हे पाणी प्या, पाच किलो वजन होणार कमी!

मित्रांनो, आजकाल प्रत्येकाचे वजन खूपच वाढलेले आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे बसणे उठण्यापासून देखील खूपच त्रास सहन करावा लागतो. तसेच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आजार देखील डोके वर काढताना दिसत आहेत. वजन वाढल्यामुळे आपणाला कोणत्याही कार्यक्रमात जाणे किंवा अनेक रोगांचा सामना देखील करावा लागतो. अनेकांचे आपल्या आरोग्याकडे विशेष असे लक्ष राहिलेले नाही. म्हणजेच खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष, व्यायामाचा अभाव, जंक फूडचा वापर अधिक यामुळे खूपच वजन वाढते आणि त्याचा खूपच त्रास देखील आपल्याला सहन करावा लागतो.

तर आज मी तुम्हाला असा एक घरगुती उपाय सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमचे पाच किलो वजन या उपायाने नक्कीच कमी होणार आहे आणि हा उपाय तुम्हाला दहा दिवस सलग करायचा आहे. तर हा उपाय कसा करायचा या उपायासाठी कोणत्या पदार्थांची आवश्यकता आहे याची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊयात.

तर मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण हे लिंबू पाणी पीत असतात. तर आज मी तुम्हाला अशाच लिंबूचा एक घरगुती उपाय सांगणार आहे. तर पहिल्यांदा आपल्याला चार लिंबू घ्यायचे आहेत आणि ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर हे लिंबू दोन भागांमध्ये कट करायचे आहेत म्हणजे चार लिंबूचे आपल्याला आठ भाग करायचे आहेत आणि नंतर या लिंबूचा रस बाजूला काढून घ्यायचा आहे आणि जे काही चिलके राहतात याचा वापर आपण या उपायासाठी करणार आहोत.

म्हणजेच लिंबूचा रस काढल्यानंतर जो भाग आपण टाकून देतो तो न टाकता त्याचाच वापर आज करायचा आहे. तर एका पातेल्यामध्ये आपल्याला एक लिटर पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये जे आपण लिंबूचा रस काढून राहिलेले चिलके असतात ते चिलके त्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि या पाण्याला उकळी द्यायची आहे. साधारणतः आठ ते दहा मिनिटांपर्यंत तुम्हाला हे पाणी उकळू द्यायचे आहे. नंतर हे पाणी थोडेसे कोमट झाल्यानंतर आपणाला हे पाणी गाळून घ्यायचे आहे. एका ग्लास मध्ये आणि त्या पाण्यामध्ये अर्धा चमचा काळे मीठ घालायचे आहे आणि व्यवस्थितपणे आपल्याला हे हलवून घ्यायचे आहे आणि नंतर ते पाणी आपल्याला गाळून घ्यायचे आहे.

हे पाणी कोमट असतानाच आपल्याला प्यायचे आहे म्हणजेच हे पाणी पूर्णतः गार झाल्यानंतर अजिबात प्यायचे नाही. तर कोमट पाणी आपणाला एक ग्लास दररोज प्यायच आहे. म्हणजेच सकाळी ज्यावेळेस तुम्ही नाश्ता करता नाश्ता झाल्यानंतर अर्धा तासाने लगेचच एक ग्लास पाणी आपल्याला हे लिंबू पाणी प्यायचे आहे. नंतर दुपारी जेवणानंतर अर्ध्या तासाने एक ग्लास हे पाणी प्यायचे आहे.

तसेच संध्याकाळी देखील जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासाने एक ग्लास पाणी आपल्याला प्यायचे आहे. असे जर सलग तुम्ही दहा ते पंधरा दिवस केला तर नक्कीच तुमचे वजन कमी झालेले तुम्हाला जाणवेल. काही लोक असे असतात जे दोन-तीन दिवस हा उपाय करतात आणि लगेचच हा उपाय सोडून देतात. परंतु तुम्ही असे न करता दररोज हा उपाय दहा ते पंधरा दिवस केला तर नक्कीच तुमचे वजन कमी कमी झालेले तुम्हाला दिसेल.

तर असा हा कमी खर्चिक असा घरगुती उपाय अवश्य करून पहा. हा उपाय करण्यासोबतच तुम्ही व्यायाम देखील आपला चालू ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे असा हा घरगुती उपाय जर तुम्ही केला तर तुमची वजन नक्कीच कमी होईल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment