मित्रानो, श्रावण मासातील तिसरा महत्त्वाचा सण म्हणजेच गोकुळाष्टमी यंदा ६ सप्टेंबर २०२३ ला साजरा होणार आहे. ६ सप्टेंबरला दुपारी ३ वाजून ३७ मिनिटांनी अष्टमी तिथीचा प्रारंभ होणार आहे तर ७ सप्टेंबर म्हणजेच दहीहंडीच्या दिवशी संध्याकाळी ४ वाजून १४ मिनिटांनी अष्टमी तिथी समाप्त होईल.
ज्योतिष शास्त्रानुसार यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमीला ग्रह व नक्षत्रांचा एक विशेष योगायोग जुळून आलेला आहे. तब्बल ३० वर्षांनी या दिवशी चंद्र रोहिणी नक्षत्र व वृषभ राशीत असणार आहे. याशिवाय रवी व सर्वार्थ सिद्धी राजयोग सुद्धा यादिवशी जुळून येत आहे. गोकुळाष्टमी विशेष या आठवड्यात नेमक्या कोणत्या राशीचे नशीब उजळणार आहे? कोणाला श्रीकृष्ण श्रीमंतीसह गोड बातमी देणार आहेत हे पाहूया.
मेष रास
बऱ्याच दिवसांपासून ज्या गोष्टींची तुम्ही वाट पाहात आहात ती गोष्ट सध्या प्रत्यक्षात पाहायला मिळणार आहे. व्यावसायिकदृष्टय़ा भरभराट होईल. नोकरदार वर्गाचे कामात लक्ष लागेल. आर्थिक टंचाई जाणवणार नाही. विवाह ठरतील. मानसिक समाधान लाभेल. अध्यात्माची गोडी वाढेल. आरोग्य ठणठणीत राहील.
वृषभ रास
व्यवसायात जुने काही व्यवहार पूर्ण करताना संयम ठेवा. नोकरदार वर्गाने कामाकडे लक्ष द्यायला हवे. आर्थिक गुंतवणूक टाळा. सोशल मीडियाचा वापर करताना भान ठेवा. कौटुंबिक गोडी व जोडीदाराची साथ तुम्हाला या आठवड्यात आनंदी ठेवू शकते.
मिथुन रास
प्रेमाच्या बाबत तुम्हाला हा आठवडा अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकतो. आपल्याला नवनवीन आर्थिक मिळकतीचे स्रोत प्राप्त होतील. मिळकतीसह खर्च सुद्धा वाढण्याची शक्यता आहे. विद्यार्थी वर्गाला हवे तसे परिणाम देणारा हा कालावधी ठरू शकतो. तुम्हाला प्रवासाच्या माध्यमातून नवीन संपर्क जोडता येऊ शकतात ज्यांचा तुम्हाला भविष्यात खूप फायदा होणार असल्याची चिन्हे आहेत. पोटाची काळजी घ्या.
कर्क रास
कर्क राशीला या आठवड्यात नशिबाची उत्तम साथ लाभू शकते. नोकरदार मंडळींना आपल्या वरिष्ठांकडून कौतुक झाल्याने हा आठवडा अगदी आनंदात जाऊ शकतो. तुम्हाला शेअर्स किंवा गुंतवणुकीच्या माध्यमातुन मोठा धनलाभ होऊ शकतो. सोनेखरेदी फायद्याची ठरू शकते. आठवड्याच्या शेवटाकडे काही प्रमाणात शीण जाणवू शकतो. सुविधांसाठी खर्च करावा लागेल पण याकडे गुंतवणूक म्हणून पाहिल्यास मानसिक भार कमी होऊ शकतो.