तुमचे घराचे स्वप्न होईल पूर्ण! फक्त इथे एक असा दिवा करा प्रज्वलित

मित्रांनो आज आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत कि ज्यामुळे तुम्हाला सुद्धा तुमच्या स्वतःचे घर बांधता येईल. प्रेत्येक व्यक्तीची अशी इच्छा असते कि त्याने त्याच्या आयुष्यात एक तरी घर बांधावे, प्रत्येक व्यक्तीला असे वाटत असते कि त्याच्या स्वतःच्या मालकीचे एक तरी घर असावे, त्यासाठी अनेकजण खूप प्रयत्न देखील करतात पण मित्रांनो आपणसुद्धा देखील प्रयत्न करत असाल तर आजच्या लेखातील एक तरी उपाय आपण नक्की करून पहा.

उपाय अगदी सोपे आहेत मात्र त्याचे परिणाम अगदी सकरात्मक व फळ मिळवून देणारे आहेत. अगदी कमी काळात तुमचे घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण होईल. बऱ्याचदा असे होते कि घर बांधण्याचे स्वप्न तर आपण पाहतो मात्र ते बांधताना अनेक समस्या उदभवतात. सगळ्यात मोठे संकट असते ते म्हणजे धानाचे, पैसे आपल्याकडे कमी पडते. बऱ्याच वेळा कुटूंबात वाद चालू असतात भावभावामध्ये पटत नाही, त्यामुळे देखील अडचणी येतात. तर मित्रांनो असे कोणतेही समस्या असूद्यात ह्या सर्व समस्यांतून तुमची सुटका होऊन तुमचे घर नक्की पूर्ण होईल.

मित्रांनो पहिला उपाय तो म्हणजे आपल्या घराच्या आसपास लाल रंगाची गाई असेल तर तिला आपण गुळाचा खडा पोळीसोबत खाऊ घालावा. जर लाल रंगाची गाई नसेल तर कोणत्याही गाईला तुम्ही हे खाऊ घालू शकता. आणि तुम्ही खाऊ घातल्यानंतर तुम्ही मनोमन प्रार्थना करा कि हे गोमाते आम्ही घर बांधण्यास निघालो आहोत तर, ते स्वप्न आमचे घराचे स्वप्न पूर्ण होउद्यात.

लक्षात घ्या कि आपला मंगळ ग्रह मजबूत असायला हवा जर मंगळ ग्रह मजबूत असेल तर काही अडचणी येत नाहीत मात्र जर तो प्रबळ नसेल तर अनेक अडचणी येतात म्हणून हा मंगळ ग्रह प्रसन्न करण्यासाठी लाल रंगाचे फार महत्व आहे. ज्या ज्या वेळी आपण लाल रंगाच्या वस्तू वापरतो दान करतो त्या त्यावेळी आपला मंगळ ग्रह हा त्यामुळे प्रभावीत होतो व प्रबळ बनतो म्हणून हा गूळ आपण लाल रंगाच्या गाईस खाऊ द्यावा.

जर आपल्या घरात जर आपल्या भावासोबत पटत नसेल तर मित्रांनो हे संबंध मधुर बनवणे फार महत्वाचे आहे. जर घरात अश्या प्रकारचे खटके उडत असतील तर आपल्या गृहकार्यात अनेक अडचणी येतात, त्यामुळे आपल्या भावाबहिणींना एखादी लाल रंगाची मिठाई खाऊ घालू शकता. ते तसे खात नसतील तर आपण आपल्या लहान मुलांमार्फत पाठवून द्या. कोणत्या ना कोणत्या मार्गांनी आपण हि मिठाई खाऊ घाला व काही दिवसातच आपण पहाल कि, तुमचे जे काही तंटे होते ते सर्व मिटतील व पुन्हा एकदा तुमचे संबंध मधुर बनतील.

उपाय दुसरा ज्यांना लवकर घर बनावे अशी इच्छा आहे त्यांनी लाल कापडात थोडीशी मसूर डाळ घ्यावी आणि अशी हि मसूर डाळ लाल कपड्यात बांधून आपण दान करायची आहे. दानधर्म केल्याने अनेक फायदे होतात. तर आपण आपले घर बांधण्यासाठी आपण हा उपाय आपण करणार आहोत. तर एका गरिबाला आपण अशी डाळ दान करावी. ह्या उपायाने देखील आपले घराचे स्वप्न पूर्ण होते.

आपल्या देवघरात आपण नित्यनियमाने मोहरीच्या तेलाचा दिवा आपण प्रज्वलित करावा, लक्षात घ्या कि दिवा हा मातीचा असावा व त्यात आपण मोहरीचे तेल टाकून हा दिवा लावायचा आहे. ज्यावेळी आपण देवपूजा करतो तेव्हा आपण दिवा प्रज्वलित करायचा आहे. जेव्हा आपण हा दिवा लावतो तेव्हा त्याची सुरवात आपण कोणत्याही मंगळवारी किंवा रविवारी करू शकता, व त्यानंतर आपण हनुमंतांना प्रार्थना करायची आहे कि हे हनुमाना आम्ही आमचे घर बांधण्यास निघालो आहोत तर आमचे घर बांधण्यात आम्हास कोणत्या अडचणी येऊ नये अशी प्रार्थना आपण करायची आहे.

जेव्हा दिव्यातील तेल संपून जात असेल तेव्हा त्यात आपण एक कापराची वडी त्यात टाकायची आहे व ती जाळायची आहे हा उपाय केल्याने तुम्हाला थोड्या दिवसातच फरक दिसून येतील. तुमच्या घर बांधण्याच्या ज्या काही अडचणी आहेत त्या हळू हळू दूर होताना तुम्हाला दिसून येतील आणि खूप कमी कालावधीत तुमचे घर पूर्ण होते.

Leave a Comment