उद्या संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांना दाखवा हा नैवेद्य सर्व संकटे होतील दूर!

मित्रानो,प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध आणि वद्य पक्षात येणारी चतुर्थी गणपती बाप्पाला समर्पित आहे. सामान्यपणे वर्षभरात १२ संकष्ट चतुर्थी येतात. मात्र, यंदा अश्विन अधिक आल्यामुळे या वर्षातील संकष्ट चतुर्थींची संख्या १३ झाली आहे. यामुळे १३ संकष्ट चतुर्थी व्रतांचे पुण्य मिळू शकेल. श्रावण महिन्यात केलेल्या पूजनाचे पुण्यफल दसपटीने मिळते, अशी मान्यता आहे. त्यामुळे श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी गणपती उपासकांसाठी विशेष महत्त्वाची मानली गेली आहे.

तसेच श्रावण महिन्यातील हे व्रत यावेळी उद्या 3 सप्टेंबर रविवार आहे. या दिवशी श्रीगणेशाची आराधना केल्याने तो तुमची सर्व संकटे दूर करतो आणि तुम्हाला सुखी आणि समृद्ध बनवतो.

श्रावणातील संकष्टी चतुर्थी हे व्रत पाळल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतो आणि तुमचे घर शुभ लाभांनी भरते. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी गणेशाची पूजा केल्याने तुमच्या कुंडलीत बुधाची स्थिती मजबूत होते. यासोबतच राहू आणि केतूचा अशुभ प्रभावही दूर होतो.

संकष्टी चतुर्थीला दुपारी गणेशाची मनोभावे पूजा करा या दिवशी गणेशाला पंचामृताने स्नान घालावे. दुर्वा अर्पण करण्यासोबत पान, फळे, फुले अर्पण करा. मोदकांचा नैवेद्य दाखवा. गणेशाच्या पूजेत चुकूनही तुटलेला व कोरडा तांदूळ अर्पण करू नये. त्यांना ओला भात अर्पण केला जातो.

जर तुम्ही तुमच्या घरामध्ये देवघरात गणेश यंत्र स्‍थापित करण्‍याबद्दल विचार करत आहात तर संकष्टी चतुर्थीला हे यंत्र स्‍थापित करू शकतात. तुमच्या घरात सुख-शांती आणि समृद्धी वाढेल.

जर तुमच्या घरातील कोणत्याही सदस्याच्या लग्नात अडथळा येत असेल तर गुळात हळद मिसळून त्याचे २१ गोळे बनवून गणपती बाप्पाला अर्पण करा. असे केल्याने त्या सदस्याचे लवकर लग्न होण्याची शक्यता निर्माण होते.

उदया गणपती बाप्पा यांना त्यांच्या आवडीचा नैवद्य तुम्ही अर्पण केला तर तुमच्या जीवनातील सर्व संकट दूर होतील. तर संकष्टी चतुर्थीच्या पूजेनंतर गणेशाला गूळ आणि देशी तुपाचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर स्वतः जाऊन हा नैवेद्य गायीला खाऊ घाला. असे केल्याने तुमच्या घरातून आर्थिक संकटे दूर होतात आणि सुख-समृद्धी वाढते.

Leave a Comment