वास्तुशास्त्रात देवघरात फार महत्त्व आहे. प्रत्येकाच्याच घरात एक श्रद्धास्थान असते ज्याला आपण देवघर म्हणतो. देवाचे पूजन करताना दररोज सकाळी आणि सायंकाळी देवासमोर दिवा लावला जातो. दिवा हे तेजाचे प्रतिक मानले जाते. दिवा लावल्याने पावित्र्य, चैतन्य आणि सकारात्मकता घरात येते. त्यामुळे दिवा लावणे हे आशेचे लक्षण मानले जाते. पण तुम्हाला माहित आहे का, वास्तुशास्त्रानुसार देवघरात दिवा कोणत्या दिशेला लावावा, ज्यामुळे घरात धन तसेच सुख समृद्धी कशी येईल, चला तर पाहूया काय सांगितलं आहे शास्त्रात.
दिवा लावल्याने घरातील नकारात्मक गोष्टी बाहेर जातात, असं म्हटलं जाते. हिंदू धर्मात देवी-देवतांच्या समोर तूप आणि तेलाचे दोन्ही दिवे लावले जातात. तुपाचा दिवा नेहमी डाव्या हातानं लावावा आणि तेलाचा दिवास नेहमी उजव्या हातानं लावावा, असे वास्तुशास्त्रात सांगितलं आहे. तुपाच्या दिव्यासाठी नेहमी पांढऱ्या कापसाचा वापर करावा, तर तेलाच्या दिव्यासाठी लाल दोऱ्याचा किंवा रक्षाधाग्याचा वापर करावा, असंही म्हटलं जाते.
वास्तुशास्त्रानुसार घरी दिवा लावल्याने घर नेहमी सकारात्मक उर्जेने सक्रिय असतं. याबरोबरच घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. शास्त्रानुसार देवी देवतेला दिव्याचा प्रकाश विशेष आवडतो. त्यामुळे पूजा करताना दिवा जाळणं शुभ मानल्या जातं. वास्तुशास्त्रानुसार, घराच्या पश्चिम दिशेला दिवा ठेवणे सर्वात शुभ मानले जाते. पश्चिमेला दिवा लावल्याने देवी लक्ष्मी घरात वास करते असे मानले जाते. याशिवाय सकारात्मक ऊर्जा आणि आनंद आणि समृद्धी येते.
दिवा लावल्याशिवाय कोणतीही पूजा, शुभ कार्य पूर्ण होत नाही, असे मानले जाते. घरात किंवा मंदिरात कोणतेही धार्मिक कार्य करण्यापूर्वी देवतांच्या समोर दिवा लावला जातो.