पुत्रदा एकादशीला दुर्मिळ योगायोग! 6 राशींवर होईल हरीची कृपा, सर्व इच्छा होतील पूर्ण

श्रावण पुत्रदा एकादशीचं व्रत आहे. हा दिवस भगवान विष्णुला समर्पित केलं आहे. श्रावणातील या एकादशीला दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे. श्री हरी आणि महादेव या दोघांची कृपा तुम्हाला प्राप्त होणार आहे यासोबत आज अतिशय शुभ असा योगायोग जुळून आले आहेत. आज प्रीति योग, आयुष्मान योग, रवि योग, सावर्थ सिद्धी योग आणि बुधादित्य योग आहे.त्यामुळे या दुर्मिळ योगायोगचा फायदा काही राशींसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. पुत्रदा एकादशी या लोकांच्या आयुष्यातील अडचणी दूर करणारी ठरणार आहे. चला जाणून घेऊयात कुठल्या आहेत या भाग्यशाली राशी..

मेष
पुत्रदा एकादशीचा दिवस या राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. तुम्हाला कामात यश मिळेल आणि चांगली बातमी मिळेल. अध्यात्मिक कार्यात तुमची रुची वाढेल. धार्मिक रुचीमुळे तुम्ही एखाद्या तिर्थक्षेत्राला भेट देणार आहात.

वृषभ
एकादशीच्या दिवस या राशीच्या लोकांना लाभदायक ठरणार आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या कोर्टकचेरीच्या प्रकरणात यश मिळणार आहे. घरात आनंदाचं वातावरण असेल. व्यावसायिकांसाठी एकादशी शुभ ठरणार आहे. नोकरदारांना बढती मिळणार आहे.

सिंह
या राशीच्या लोकांसाठी हा दिवस खूप फलदायी ठरणार आहे. आर्थिक फायदा होणार आहे. व्यावसायिकांसाठी चांगली बातमी मिळेल. पदोन्नतीची दाट शक्यता आहे. सहलीला जाण्याचा प्लन करणार आहे.

कन्या
या राशीच्या लोकांसाठी पुत्रदा एकादशी लकी ठरणार आहे. वाहन, जमीन आणि मालमत्ता खरेदीचे योग आहेत. नोकरीची नवीन ऑफर मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी एकादशी फलदायी ठरणार आहे.आर्थिक लाभ होणार आहे.

धनु
या राशीच्या लोकांसाठी एकादशी शुभ ठरणार आहे. भगवान विष्णूसोबतच भगवान शिवाच्या आशिर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे. नशिबाची साथ तुम्हाला लाभणार आहे. धनलाभाचे योग आहेत. कुटुंबात समृद्धी वाढणार आहे.

Leave a Comment