सण 31 ऑगस्टला पहाटे साजरा केल्यास उत्तम होईल. यावेळी रक्षाबंधनाच्या दिवशी ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती विशेष असणार आहे. या दिवशी काही उपाय केल्यास खूप शुभफळ प्राप्त होतात. आपल्या भावांच्या प्रगतीसाठी आणि आर्थिक स्थिती बळकट होण्यासाठी बहिणींनी रक्षाबंधनाच्या दिवशी काही उपाय करावेत. यामुळे भाऊ-बहिणीचे नातेही घट्ट होते. भावा-बहिणीमध्ये मतभेद असल्यास रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने प्रथम गणेशाला राखी अर्पण करावी आणि नंतर भावाला राखी बांधावी. यामुळे भाऊ-बहिणीमधील प्रेम वाढते आणि नाते घट्ट होते. यासोबतच घरात सुख-समृद्धी येते.
भावाची आर्थिक स्थिती बळकट होण्यासाठी
भावाच्या आर्थिक स्थितीत प्रगतीसाठी रक्षाबंधनाच्या दिवशी हे उपाय अवश्य करावेत. यासाठी बहिणीने अखंड, सुपारी आणि चांदीचे नाणे गुलाबी कपड्यात ठेवून भावाला द्यावे. भावाने हे नाणे आणि सुपारी तिजोरीत ठेवावे. हा उपाय केल्याने कधीही पैशाची कमतरता भासत नाही.