मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर हे असते आणि सकाळ संध्याकाळ आपण देवी देवतांची विधीवतपणे पूजा देखील करीत असतो. म्हणजेच आपल्या घरात तुमच्या काही अडचणी असतील, दुःख असते संकटे असतील ही सर्व दूर व्हावी तसेच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी, कशाची कमतरता आपल्याला भासू नये यासाठी आपण अनेक प्रकारचे व्रत उपवास तसेच देवी देवतांची पूजा अर्चना मनोभावे श्रद्धेने करत असतो.
तर मित्रांना आज मी तुम्हाला तुमच्या घरामध्ये असणाऱ्या देवघरांमध्ये किती आणि कोणते देव असावेत याविषयी माहिती सांगणार आहे. म्हणजे मित्रांनो आपल्या शास्त्रामध्ये आपल्याला देवघरांमध्ये देवतांची संख्या किती असावी याबद्दल सांगितलेले आहे. कारण जर तुम्ही देवघरांमध्ये खूपच अडचण केली तर त्याचा नकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊ या देवघरात नेमके किती आणि कोणते देव असावेत?
तर मित्रांनो आपल्या घरातील देवघर असते ते कायम स्वच्छ असणे गरजेचे आहे. तसेच देवघरांमध्ये विष्णू श्रीराम आणि पांडुरंग यांचे एकच मूर्ती असायला हवी म्हणजेच या प्रत्येकाची एक एक मूर्ती न ठेवता हे तिन्ही देव एकच आहेत. त्यामुळे तुम्ही यापैकी कोणत्याही देवतांची एकच मूर्ती ठेवायची आहे. तसेच माता दुर्गा सरस्वती आणि अन्नपूर्णा यांची देखील एकच मूर्ती ठेवावी. तुम्ही देवघरांमध्ये माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णेची मूर्ती ठेवू शकता.
तसेच आपल्या देवघरांमध्ये बाळकृष्ण देखील एकच असावा. तसेच आपल्या घराची सून असते त्यांच्या माहेरघरची अन्नपूर्णेची मूर्ती किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल एकच असावी म्हणजेच अन्नपूर्णा मातेची आणि बाळकृष्णाची अशा दोन मूर्ती आपल्याला देवघरांमध्ये ठेवायचे आहेत.
तसेच जर तुमच्या पितरांचे काही टाक वगैरे असतील तर ते टाक तुम्ही अजिबात आपल्या देवघरांमध्ये ठेवायचे नाही. कारण यामुळे जो काही पितृदोष असतो तो देखील आपल्या घरात उद्भवू शकतो. म्हणजेच देवघरांमध्ये पितरांचे टाक ठेवण्याची जागा नसते. त्यामुळे पितरांचे टाक कधीही ठेवायचे नाही. तर तसेच माता लक्ष्मीचा फोटो तुम्ही अवश्य आपल्या देवघरांमध्ये ठेवायचा आहे.
तसेच तुमची जी कुलदेवी आहे त्यांचे टाक तुम्ही बनवून आणले असतील तर हे देखील तुम्ही आपल्या देवघरांमध्ये आवश्यक ठेवावे. तसेच आपल्या देवघरात घंटा,शंख अजिबात ठेवू नये. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही आपल्या देवघरामध्ये योग्य त्या मूर्ती ठेवून देवघर आपले स्वच्छ नीटनेटके कायम ठेवायचे आहे. यामुळे आपल्या घरामध्ये देवतांचा वास राहतो.
आपण जी पूजा करतो ती देवतापर्यंत सहज पोहोचते. कारण देवघरांमध्ये जर खूप सारी अडचण केला तर यामुळे देवतांचा कृपा आशीर्वाद आपल्याला भेटणार नाही आणि घरामध्ये सुख-समृद्धी देखील येणार नाही. त्यामुळे देवघरात गर्दी देखील अजिबात करू नये.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.