१ जूनपासून होणार होणार ‘हे’ मोठे बदल; तुमच्या खिशावर थेट परिणाम

जून महिना गुरुवारपासून सुरू होईल. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी देशात काहीतरी बदल होत असतात. १ जूनपासून अनेक बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे.त्यामुळे जून महिना सुरू होण्यापूर्वी जाणून घ्या कोणते बदल होणार आहेत आणि त्यांचा तुमच्या बजेटवर कसा परिणाम होईल. एलपीजी सिलिंडरच्या किमती पेट्रोलियम कंपन्या बदलू शकतात.

इलेक्ट्रिक टू व्हीलर होणार महाग
१ जूनपासून देशात इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करणे महाग होणार आहे. म्हणजेच १ जूननंतर तुम्ही इलेक्ट्रिक बाइक किंवा स्कूटर खरेदी करायला गेलात तर तुम्हाला जास्त किंमत मोजावी लागेल. २१ मे रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, अवजड उद्योग मंत्रालयाने FAME-II अनुदानाची रक्कम सुधारित केली आहे आणि ती १०००० रुपये प्रति kWh इतकी कमी केली आहे. त्याच वेळी, पूर्वी ही रक्कम १५००० रुपये प्रति किलोवॉट होती. यामुळे, बहुतेक इलेक्ट्रिक वाहने २५००० ते ३५००० रुपयांपर्यंत महाग होऊ शकतात.

रिझर्व्ह बँकेचे अभियान
१ जूनपासून, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देशातील बँकांमध्ये जमा केलेल्या दावा न केलेल्या रकमेचा निपटारा करण्यासाठी मोहीम सुरू करणार आहे. या मोहिमेला ‘१०० दिवस १०० पे'(100 Days 100 Pay) असे नाव देण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात बँकांना कळवले आहे. या मोहिमेअंतर्गत १०० दिवसांत १०० हक्क नसलेल्या रकमेचा निपटारा केला जाईल.

LPG घरगुती गॅसच्या दरात बदल
सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किमती बदलतात. एलपीजी गॅसच्या किमती दर महिन्याच्या एका तारखेला निश्चित केल्या जातात. एप्रिल आणि मेच्या पहिल्या तारखेला १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली होती. मात्र, १४ किलो एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. मार्च महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांपर्यंत कपात करण्यात आली होती.

CNG-PNG च्या किमती बदलू शकतात
एलपीजी सिलिंडरप्रमाणेच सीएनजी-पीएनजीच्या किमतीही दर महिन्याच्या पहिल्या दिवशी बदलतात. पेट्रोलियम कंपन्या दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये सीएनजी-पीएनजीच्या किमती बदलतात. एप्रिलमध्ये दिल्ली आणि मुंबईमध्ये सीएनजी-पीएनजीच्या दरात कपात करण्यात आली होती. १ मे रोजी फारसा बदल झाला नाही. अशा स्थितीत सर्वसामान्यांच्या नजरा एक तारखेकडे लागल्या असून सीएनजी-पीएनजीच्या दरात बदल होण्याची त्यांना अपेक्षा आहे.

अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment