मित्रानो,प्रत्येकाच्या मनात काही ना काही इश्चा ही असतेच. प्रत्येक माणसाचे एक स्वप्न असते की, त्याच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमतरता असू नये, त्याचे संपूर्ण आयुष्य सुखसोयींनी भरलेले असावे. क्वचितच अशी माणसे असतात ज्यांना आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता नसते.
परंतु असे कधी होत नाही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या समस्या असतातच. या समस्यांमुळे आपण नेहमी हताश आणि निराश झालेलो असतो. त्यातही पैशासंबधी आणि नोकरीसंबंधी समस्या तर प्रत्येकाला भेडसावत असतात. त्यामुळे माणूस हताश आणि निराश होऊन जातो.
आपणही आपल्या आयुष्यामध्ये अश्या समस्याचा सामना करत आहात तर आता चिंता सोडून द्या कारण आम्ही जी गोष्ट आपल्याला सांगणार आहोत तो केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील आणि आपली प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल.
ज्योतिषशास्त्रानुसार असे मानले जाते की जर शनिवारचा हा उपाय सतत ७ दिवस केल्यास त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व समस्या कायमच्या दूर होऊन जातात.
जर तुम्ही तुमच्या आयुष्यातील समस्यांपासून त्रस्त आहात आणि या समस्यांपासून आपल्याला मुक्ति हवी असल्यास आणि तुमची कोणतीही मनोकामना पूर्ण करायची असल्यास तुम्हाला शनिवारी सूर्यास्तानंतर जुन्या पिंपळाच्या झाडाखाली लाल शाही किंवा पेन, लाल कपडा, लाल दोरा व पिठापासून बनवलेला दिवा ज्यामध्ये गायीचे तूप घालून तिथे घेऊन जावे लागेल.
जेव्हा तुम्ही ह्या सर्व गोष्टी घेऊन जाल त्यावेळी पिंपळाच्या त्या झाडाखाली पिठापासून बनवलेला दिवा लावावा आणि हनुमान चालीसाचे पठन करावे.
हनुमान चालीसाचे पठन पूर्ण झाल्यानंतर पिंपळाच्या झाडाच्या कोणत्याही पानावर आपली मनोकामना लाल शाई किंवा पेनाने लिहा. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा कि ज्या पानावर तुम्ही तुमची मनोकामना लिहाल त्या पानावर लाल दोरा सात वेळा बांधावा. पण लक्षात असू द्या कि दोरा एकदम ढिला असावा. आणि पिंपळाचे पान तोडू नका.
जेव्हा तुम्ही पिंपळाच्या पानाच्या फांदीवर दोरा बांधाल त्याचवेळी तुम्ही तुमच्या हातावर देखील तो दोरा ७ वेळा बांधून घ्यावा.
हि सर्व कामे केल्यानंतर तुम्ही दोन मिनिटे शांत रहा आणि त्याच ठिकाणी पिंपळाच्या झाडाखाली बसा, किंवा उभे राहून आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी
ऊँ हृी वट स्वाहा या मंत्राचा जाप २५१ वेळा करा.
त्यांनतर पिंपळाच्या झाडाखालील चिमूटभर माती घेवून ती लाल कपड्यामध्ये गुंडाळावी आणि ती आपल्या घरी घेऊन तिजोरीमध्ये ठेवावी.
हि गोष्ट आपण सलग ७ शनिवार करावी. यामुळे तुमच्या सर्व इच्छा हळू हळू पूर्ण होतील आणि तुमच्या आयुष्यातील बऱ्याच समस्यापासून तुम्हाला सुटका मिळेल. याचबरोबर बजरंगबलीची कृपा देखील तुमच्यावर सतत राहील. ज्योतिषशास्त्रानुसार शनिवारी किव्हा रविवारी हि गोष्ट केल्याने अत्यंत प्रभावी मानली जाते. हा उपाय सलग ७ शनिवार किव्हा रविवारी मनोभावे केल्यास त्याचा परिणाम तुमच्या जीवनात लगेच दिसू लागेल.