श्रावणी सोमवारी करा ‘हे’ विशेष उपाय आर्थिक अडचणी होतील दूर!

मित्रानो श्रावण मास सुरू झालेला आहे. आज श्रावणातील पहिला सोमवार आहे. हा संपूर्ण महिना धार्मिक विधींनी युक्त असतो. यात विशेषतः श्रावणी सोमवारी महादेवाची पूजा आणि उपास केला जातो. महिला या दिवशी इच्छित मनोकामना पूर्तीसाठी शिवामूठ वाहतात. अशा वेळेस पुरुषांनीदेखील आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी काही उपाय केले असता त्यांना लाभ होऊ शकतो असे ज्योतिष शास्त्र सांगते. ते उपाय कोणते आणि कसे करावेत याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.

भगवान शिवाला हा महिना खूप प्रिय आहे आणि या महिन्याचा धन आणि समृद्धीशी विशेष संबंध आहे. या महिन्यात आपल्या नित्य कर्माबरोबर छोटे-छोटे उपाय करून तुम्हाला धन-समृद्धी सहज मिळू शकते. यासाठी पुढील उपाय तुम्हाला नक्की उपयोगी पडू शकतील.

सोमवारी शंकराच्या मंदिरात जाऊन शिवलिंगाला कलशातून पाणी अर्पण करावे. यानंतर तेथे बसून शिवाच्या मंत्राचा अर्थात ‘ओम नमः शिवाय’ या मंत्राचा किमान १०८ वेळा जप करावा.

या मंत्राचा जप केल्यानंतर माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप ‘ओम श्रीं ह्रीं कमले कमलये प्रसीद प्रसीद श्रीं श्रीं श्रीं महालक्ष्मीयै नमः’ या मंत्राचा जप करावा. संध्याकाळी शंकराची आणि देवीची आरती करावी. आरती झाल्यावर आपली आर्थिक अडचण देवाला सांगून ती दूर होण्यासाठी प्रार्थना करावी.

संपूर्ण श्रावण महिना शिव मंदिरात जाऊन शंकराचे दर्शन घेतल्यानेही बराच लाभ होतो. शक्य असेल तर महादेवाला लाल किंवा पांढरे फुल महिनाभर अर्पण करा. या रंगाची फुले देवाला प्रिय असतात. मात्र श्रावणात फुलांचे भाव चढे असतात. त्यामुळे ते विकत घेऊन अर्पण करणे जर कोणाला परवडत नसेल तर मनोभावे नमस्कार करून देवाला आपली अडचण सांगावी. मात्र दर्शनात सातत्य ठेवावे.

Leave a Comment