श्रावणात गजलक्ष्मी आणि लक्ष्मी नारायण योग! बक्कळ धनलाभासह व्यवसायात भरपूर होणार नफा

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार एका ठराविक वेळेनंतर ग्रह आपली स्थिती बदलतात म्हणजे ते एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. सुख, वैभव आणि समृद्धीचा कारक शुक्र कर्क राशीत प्रवेश करणार आहे. गजलक्ष्मी राजयोग तयार होतो आहे. शिवाय बुध शुक्र यांची युती होणार आहे. त्यामुळे लक्ष्मी नारायण योग निर्माण होतो आहे.

गजलक्ष्मी राजयोग या राशींना लाभ
तूळ
या राशींच्या व्यापारी आणि नोकरी व्यावसायिक दोघांसाठीही हा काळ उत्तम असणार आहे. धनलाभामुळे आर्थिक स्थिती चांगली होणार आहे. व्यवसायात प्रगतीचे योग आहेत. कार्यक्षेत्रातील सहकाऱ्यांशी संबंध चांगले होणार आहे. पदोन्नती होणार असून भौतिक सुखसोयी वाढणार आहे.

कन्या
गजलक्ष्मी राजयोग या राशींच्या लोकांसाठी फलदायी ठरणार आहे. कामात यश प्राप्त होणार आहे. वडिलोपार्जित संपत्तीतू फायदा होईल. जोडीदारासोबत चांगला ताळमेळ राहिल्याने वैवाहिक जीवन आनंदच आनंद असेल. जुन्या गुंतवणुकीतूव फायदा होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी प्रगती होणार आहे.

मिथुन
गजलक्ष्मी राजयोग प्रगती, लाभ आणि समृद्धी घेऊन आला आहे. गजलक्ष्मी राजयोगातून या राशींच्या लोकांना भरपूर लाभ होणार आहे. या काळात त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. मार्केटिंग, शिक्षण, मीडिया किंवा कम्युनिकेशन क्षेत्राशी संबंधित असलेल्या लोकांसाठी हा सुवर्ण काळ सिद्ध होणार आहे.

कर्क
गजलक्ष्मी राजयोगामुळे या राशीच्या लोकांना उत्पन्नाचे स्त्रोत गवसणार आहे. अनेक मार्गाने पैसा मिळणार आहे. प्रेमप्रकरणात यश मिळणार आहे. पैशाची बचत करण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात. गुंतवणुकीत आर्थिक लाभ मिळणार आहे. नोकरीची नवीन संधी मिळणार आहे.

लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना होणार लाभ
धनु
लक्ष्मी नारायण योग धनु राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना यश मिळणार आहे. प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळणार आहे. अचानक आर्थिक फायदा झाल्यामुळे तुमचं मन प्रसन्न असणार आहे. चांगली बातमी मिळणार आहे.

वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांना लक्ष्मी नारायण योगामुळे फायदा होणार आहे. नोकरी आणि व्यवसायात यशस्वी होणार आहात. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली संधी मिळणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल. आर्थिक अडचणीवर मात कराल.

सिंह
लक्ष्मी नारायण योगामुळे सिंह राशीच्या लोकांना प्रचंड लाभ होणार आहे. तुमचा आत्मविश्वास द्विगुणीत होणार आहे. जोडीदारासोबत नातं संबंध मजबूत होणार आहे. उत्पन्नात वाढ होणार आहे. आरोग्याची समस्या दूर होईल.

Leave a Comment