मित्रानो, आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक सण उत्सव अगदी आनंदाने साजरे केले जातात. प्रत्येक दिवसाला विशेष असे महत्त्व प्राप्त झालेले आहे.पुरुषोत्तमी अमावस्या 16 ऑगस्ट, बुधवारी आहे. हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे आणि मलमासातील अमावस्या तिथीचे आगमन बऱ्याच कारणाने महत्त्वाचे मानले जाते.
या दिवशी पितरांना गती प्राप्त होण्यासाठी काही उपाय केल्याने आणि दानधर्म केल्यास विशेष फळ मिळते. पुरुषोत्तमी अमावस्याला मलमास किंवा अधिक मास अमावस्या असेही म्हणतात. या दिवशी भगवान शंकराची विधिवत पूजा केल्याने ग्रह-नक्षत्रांचे अशुभ प्रभाव दूर होऊन पितृदोष समाप्त होतो. पुरुषोत्तमी अमावस्या तिथीला या गोष्टी शिवलिंगावर काही गोष्टी अर्पण केल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि पितरांचा आशीर्वादही प्राप्त होतो असे ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहे. चला जाणून घेऊया पुरुषोत्तमी अमावस्येला शिवलिंगावर कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात.
पुरुषोत्तमी अमावस्येला शिवलिंगावर मध आणि पांढरे तीळ अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. असे केल्याने समाजात रुप सौंदर्य व सन्मान वाढतो. यासोबत पितृदोष दूर होतो आणि बीपी आणि मधुमेहाचे आजारही दूर राहतात. असे मानले जाते की असे केल्याने सर्व पाप नष्ट होतात आणि आरोग्य देखील प्राप्त होते.
पुरुषोत्तमी अमावस्येच्या दिवशी शिवलिंगावर चांदीचा नाग आणि पाणी आणि बेलपत्र अर्पण करावे. असे केल्याने सर्प दोषासह पितृदोष संपतो आणि पितरांचा आशीर्वादही प्राप्त होतो. असे मानले जाते की चांदीचा नाग अर्पण केल्याने सुख, समृद्धी आणि संपत्तीचा मार्गही बनतो.
रूईचे पान हे भगवान शंकराला प्रिय आहे, म्हणून पुरुषोत्तमी अमावस्येच्या दिवशी शिवलिंगावर रूईचे पान अर्पण करावे. असे केल्याने मानसिक आणि शारीरिक समस्या दूर राहतात आणि ग्रहांचा शुभ प्रभावही मिळतो. तसेच भगवान शंकराच्या कृपेने जीवनातील सर्व संकटे दूर होतात.
पुरुषोत्तमी अमावस्येच्या दिवशी शिवलिंगावर उसाचा रस अर्पण करणे खूप लाभदायक मानले जाते. असे केल्याने पितृदोष दूर होतात आणि सांसारिक सुखांची प्राप्ती होते. शिवलिंगावर उसाचा रस अर्पण करताना ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत राहा. उसाचा रस अर्पण केल्याने आर्थिक संकट दूर होऊन जीवनात सुख-समृद्धी नांदते अशी मान्यता आहे.
पुरुषोत्तमी अमावस्येच्या दिवशी शक्य असल्यास 108 बेलपत्रावर पांढर्या चंदनाने राम लिहून ओम नमः शिवाय मंत्राचा उच्चार करताना शिवलिंगावर अर्पण करा. जर 108 बेलपत्र शक्य नसेल तर 11 बेलपत्र देखील देऊ शकता. असे केल्याने ग्रह दोष दूर होतात आणि पितृदोषही दूर होतात. हा उपाय पंचमी तिथी, त्रयोदशी तिथी आणि चतुर्दशी तिथीलाही केला जाऊ शकतो.