18 ऑगस्टपासून ‘या’ राशींना मंगलमय काळ! सुख समृद्धीसोबत धनलाभाचे अपार योग

वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह गोचरला अतिशय महत्त्व आहे. ग्रहाचा राजा सूर्य ग्रह 17 ऑगस्टला गोचर केल्यानंतर ग्रहांचा सेनापती मंगळ 18 ऑगस्ट 2023 ला कन्या राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ हा धैर्य, पराक्रम, जमीन, विवाहाचा कारक मानला जातो. त्यामुळे जेव्हा मंगळ संक्रमण करतो तेव्हा 12 राशींवर याचा मोठा परिणाम होतो. काहींवर सकारात्मक परिणाम तर काही राशींना वाईट परिणाम भोगावे लागतात. मंगळ गोचरनंतर कुंडलीतील स्थानानुसार त्याचा परिणाम जाचकावर होतो.

खरं तर मंगळानंतर ग्रहांचा राजकुमार बुध ग्रहदेखील गोचर करणार आहे. बुध ग्रह देखील कन्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे कन्या राशीत मंगळ आणि बुध याची भेट होणार आहे. त्यामुळे काही राशींना त्याचा अपार फायदा होणार आहे.

मेष राशी
मंगळ गोचरमुळे या राशीच्या लोकांना खूप फायदा होणार आहे. ही लोक या काळात शत्रूंवर मात करण्यात यशस्वी होतील. कोर्टकचेरीचे प्रकरण मार्गी लागेल. प्रत्येक कामात यश आणि प्रगती प्राप्त होईल. या काळात रागावर नियंत्रण ठेवल्यास तुम्हाला अतिशय फायदा होणार आहे. आर्थिक लाभ होणार आहे.

मिथुन राशी
मंगळ गोचरमुळे या राशीच्या लोकांना लाभदायक ठरणार आहे. व्यवसायिक लोकांचे अच्छे दिन सुरु होणार आहे. तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे. करिअरमध्ये अपेक्षित यश आणि प्रगती होणार आहे. त्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न राहणार आहे. घरात एखादी समस्या उभी राहू शकते पण संयमाने निर्णय घेतल्यास त्यावर मात करु शकणार आहात. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवणार आहात.

कर्क राशी
मंगळाचे संक्रमण कर्क राशीच्या लोकांसाठी खूप शुभदायक असणार आहे. तुम्ही एखाद्या ओळखीच्या किंवा जवळच्या मित्राच्या भेटीने तुम्ही आनंदी असाल. स्पर्धा परीक्षा किंवा उच्च शिक्षणाची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळणार आहे. शत्रूंवर मात करणार आहात.

वृश्चिक राशी
मंगळाचे भ्रमण वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मंगलमय ठरणार आहे. त्यांचा अनेक इच्छा या काळात पूर्ण होणार आहे. तुमची सामाजिक सक्रियता वाढणार आहे. तुम्ही मजबूत नेटवर्क तयार करण्यात यशस्वी व्हाल. या दिवसांमध्य तुमची लोकप्रियता वाढणार आहे. तुमचे विरोधकही मित्रांसारखे वागणार असल्याने तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. आर्थिक लाभामुळे कर्ज फेडणार आहात.

धनु राशी
मंगळाची राशी धनु असल्यामुळे या राशीच्या लोकांसाठी त्याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. करिअरमध्ये तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. नोकरदार लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळेल. तुमचा आत्मविश्वास वाढल्यामुळे कामासोबतच कुटुंबालाही पूर्ण वेळ देण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.

Leave a Comment