उद्या कमला एकादशीला करा हे उपाय, धन-प्रसिध्दी वाढेल, संकटे होतील दूर!

यंदा कमला एकादशीचे व्रत 12 ऑगस्टला शनिवारी आहे. याला अधिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी असेही म्हणतात. कमला एकादशीची तिथी शुक्रवार, 11 ऑगस्ट रोजी पहाटे 05.06 वाजता सुरू होईल आणि शनिवार, 12 ऑगस्ट रोजी सकाळी 06.31 वाजता समाप्त होईल.

द्वादशी असलेल्या एकादशी तिथीचे व्रत करण्याचे महत्त्व आहे. श्रावण महिन्यातील शनिवारी कमला एकादशीचं व्रत आहे. या एका व्रताने तुम्हाला भगवान शिव, श्री हरी विष्णू, वीर हनुमान आणि न्यायदेवता शनि महाराज यांचा आशीर्वाद मिळू शकतो. श्रावणातील प्रत्येक दिवस भगवान शिवाच्या पूजेसाठी समर्पित आहे आणि एकादशीला विष्णूची पूजा केली जाते.

शनिवार हा हनुमान आणि शनिदेवाच्या पूजेचा दिवस आहे. त्यामुळे काही सोप्या ज्योतिषीय उपायांनी तुम्ही 12 ऑगस्टला या चार देवतांचा आशीर्वाद मिळवू शकता. काशीचे ज्योतिषाचार्य चक्रपाणी भट्ट यांनी कमला एकादशीला करणाऱ्या उपायांची माहिती दिली आहे.

संपत्ती, कीर्ती आणि मोक्षासाठी: जो व्यक्ती पद्धतशीरपणे कमला एकादशीचे व्रत करतो आणि विष्णूची पूजा करतो, त्याला धन, कीर्ती आणि मोक्ष प्राप्त होतो.

या दिवशी पूजेच्या वेळी भगवान विष्णूच्या ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. या मंत्राने सर्व मनोकामना पूर्ण होतात. विष्णूपूजेत तुळशीची पाने आणि पंचामृत न विसरता घ्या.

दु:खांपासून मुक्ती मिळवण्यासाठी12 ऑगस्टला कमला एकादशीच्या दिवशी पिंपळाचे झाड असलेल्या एखाद्या मंदिरात जा. तेथे भगवान विष्णूची पूजा करावी. नंतर पिंपळाच्या मुळांवर पाणी शिंपडावे. त्यानंतर तिथं तुपाचा दिवा लावावा. शनिदेवासाठी तेलाचा दिवा लावावा.

हा उपाय केल्याने कर्जापासून मुक्ती मिळते. भगवान विष्णू, ब्रह्मदेव आणि भगवान शिव प्रसन्न होतात. शनिदेवाच्या कृपेने साडेसातीचे दुष्परिणाम संपतात.

भगवान हरिहरच्या आशीर्वादासाठी हरि म्हणजे भगवान विष्णू आणि हर महादेव.
कमला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला पिवळी फुले, हळद, पिवळे चंदन, बेसन लाडू, केळी अर्पण करा. शंकराला दुधात केशर मिसळून अर्पण करा. यामुळे तुम्हाला भगवान हरी हरचा आशीर्वाद मिळेल. आर्थिक सुबत्ता येईल, नशीब बलवान होईल, वैवाहिक जीवन चांगले राहील आणि वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतील.
ग्रह दोषही दूर होतात, असे मानले जाते.

संकटांपासून रक्षण करण्यासाठी शनिवारी कमला एकादशीला मंदिरात जाऊन हनुमानाची पूजा करा. मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. मारुतीला गूळ, हरभरा आणि केळी अर्पण करा.

त्यानंतर सुंदरकांड आणि हनुमान चालिसाचे पठण करा. असे केल्याने हनुमान प्रसन्न होईल आणि शनिदेवाचा आशीर्वादही प्राप्त होईल. दोघांच्या आशीर्वादाने संकटांपासून संरक्षण मिळेल.

सुख, शांती, समृद्धीसाठी कमला एकादशीला शक्य असल्यास घरात तुळशीचा रोप ईशान्य दिशेला ठेवावा.

एकादशी पूजेनंतर सकाळी तुळशीची पूजा करावी. पाणी शिंपडून प्रदक्षिणा घाला. संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा. या उपायाने घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदेल.

Leave a Comment