घरातून बाहेर पडताना, शुभ कार्य करताना या चमत्कारी मंत्राचा करा जप! संकटातून मिळेल मुक्ती, होईल भरभराट

हिंदू धर्मात पूजा-पाठ याच्यासोबतच मंत्रांचा जप करण्याला विशेष महत्त्व आहे. ज्या घरात नियमितपणे मंत्रांचा जप करण्यात येतो त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि आयुष्यात सुख-समृद्धी येते. तसेच आयुष्यात सुख-समृद्धी येते. अनेक प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी शास्त्रांमध्ये मंत्र सांगण्यात आले आहेत.

नियमानुसार या मंत्रांचा जप केल्यास कोणत्याही व्यक्तीचे भाग्य उजळते, त्याच्यावरील संकटे दूर होतात. शास्त्रात सांगण्यात आले आहे की, एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घरातून बाहेर पडताना तुम्ही काही मंत्रांचा जप केल्यास तुम्हाला यश नक्की मिळते.

घरातून बाहेर पडताना या मंत्राचा करा जप
श्री गणेशाय नम:
श्री गणेशाची पूजा सर्वप्रथम करण्यात येते. त्यामुळेच त्यांना प्रथमपूज्य देव असे म्हणतात. कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी आणि महत्त्वाच्या कामासाठी घरातून बाहेर पडण्यापूर्वी ‘श्री गणेशाय नम:’ मंत्राचा जप करा. या मंत्राचा कमीत कमी अकरा वेळा जप केल्याने आपल्यावरील संकटे दूर होतात आणि प्रत्येक कार्यात यश मिळते.

ॐ ऐं श्रीं भाग्योदयं कुरु कुरु श्रीं ऐं फट्
या मंत्राचा जप केल्याने आयुष्यात सकारात्मकता येते आणि सुख-शांती कायम राहते. या मंत्राचा जप केल्याने आयुष्यातील सर्व संकटांपासून मुक्ती सुद्धा मिळते. तसेच त्या व्यक्तीचे भाग्य उजळते. तुम्हाला जर एखाद्या कामात यश मिळत नसेल तर या मंत्राचा 11 वेळा जप करा.

राम लक्ष्मणौ सीता च सुग्रीवों हनुमान कपि |
पञ्चैतान स्मरतौ नित्यं महाबाधा प्रमुच्यते ||
हा मंत्र भगवान श्रीराम यांना समर्पित आहे. या मंत्राचा जप केल्याने सर्व कार्य यशस्वी होतात. तसेच प्रत्येक कार्यात येणारे अडथळे दूर होतात. जर तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर जात असाल तर घरातून बाहेर पडण्यापूर्वी या मंत्राचा जप नक्की करा.

Leave a Comment