गुडघेदुखी व हाडांच्या वेदना ‘या’ घरगुती उपायांनी होतात चुटकीसरशी गायब!

मित्रांनो,गुडघेदुखी ही एक सामान्य समस्या आहे. आता केवळ वृद्धच नाही तर तरुणांनाही याचा सामना करावा लागत आहे. आहारात Vitamin D, Calcium आणि Iron यासारख्या आवश्यक पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे आणि वाढत्या वयामुळे स्नायू आणि टिश्यूसचे नुकसान झाल्यामुळे ही समस्या उद्भवते. अनेकांना प्रश्न असतो की गुडघेदुखीवर उपचार काय? तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गुडघेदुखीला हलक्यात घेऊ नये.

अधूनमधून गुडघेदुखी होणे हे अगदीच सामान्य आहे परंतु जर तुम्हाला सतत आणि तीव्र वेदना होत असतील तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरकडे जावे. घरगुती उपाय, व्यायाम आणि औषधांनी गुडघेदुखीवर उपचार करता येतात. आता आपण घरगुती उपाय जाणून घेऊया.

स्नायूंमधील ताण किंवा सांधेदुखी तसेच गुडघेदुखीसाठी आले उत्तम आहे. आल्यामध्ये अँटीइंफ्लेमेट्री, अँटीअल्सर आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. ते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. यासाठी तुम्ही आल्याचा चहा किंवा आल्याचे पाणी पिऊ शकता किंवा आल्याची पेस्ट बनवून वेदना होणा-या जागी लावू शकता.

हळदीमध्ये अँटीइन्फ्लमेट्री गुणधर्म असतात आणि हळद हे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. गुडघेदुखीवर उपचार करण्यासाठी हळदीचा वापर अनेक प्रकारे करता येतो. गरम दुधात हळद मिसळून तुम्ही याचे सेवन करू शकता. शिवाय तुम्ही प्रभावित भागावर हळदीची पेस्ट देखील लावू शकता.

गुळवेल सांधेदुखीच्या वेदनांवर उपयुक्त ठरू शकते. अनेक डॉक्टर सुद्धा सांधेदुखीच्या, गुडघ्याच्या वेदनेवर गुळवेलचा रस पिण्याचा सल्ला देतात. गुळवेलमध्ये अँटीइंफ्लेमेटरी आणि संधिवाताविरोधी गुणधर्म आहेत जे संधिवात कमी करण्यास मदत करतात. सांधेदुखीसाठी गुळवेल पावडर कोमट दुधासोबत घ्या.

गुडघेदुखी दूर करण्यासाठी मोहरीचे तेल खूप फायदेशीर आहे. हे गुडघ्याच्या आसपासच्या नसांमधील रक्त प्रवाह वाढवते, स्नायू आणि सांधेदुखी कमी करते. यासाठी मोहरीच्या तेलात ठेचलेली लसणाची एक पाकळी टाकून गुडघ्यांना मसाज करा.

एप्सम सॉल्ट, रॉक सॉल्ट किंवा सैंधव मीठामध्ये वेदना कमी करणारे गुणधर्म असतात, जसे की मॅग्नेशियम आणि सल्फेट. विशेषतः मॅग्नेशियममुळे प्रभावित भागाची सूज कमी होते. यासाठी आंघोळीच्या पाण्यात सैंधव मीठ मिसळा. या मीठाच्या पाण्यात अंघोळ केल्याने रक्त प्रवाह सुधारतो. याशिवाय तुम्ही तुमच्या पाण्यात पुदीन्याचं तेल आणि लोबान तेल देखील घालू शकता.

गुडघेदुखी दूर करण्यासाठी लिंबाचा रस प्रभावी उपाय म्हणून काम करतो. लिंबूमध्ये असलेले सायट्रिक ऍसिड शरीरातील यूरिक ऍसिड कमी करते जे गाउटचे कारण आहे. लिंबूमध्ये अँटीइंफ्लेमेटरी गुणधर्म देखील असतात जे सूज, वेदना आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात. यासाठी तुम्ही लिंबाची साल (सुती कापडात गुंडाळून) गरम तिळाच्या तेलात भिजवून गुडघ्यावर ठेवू शकता.

Leave a Comment