रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींना करा ही प्रार्थना!स्वामी कायम पाठीशी उभे असतील !

रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींना ही प्रार्थना करा की,कारण आपण अशा प्रार्थने मधूनच आपल्या स्वामीपर्यंत,आपल्या गुरू पर्यंत त्या देवा पर्यंत आपली भावना पोहोचवू शकतो आणि त्यांची कृपा प्राप्त करू शकतो.जेव्हा आपल्याला काहीतरी सांगायचे असते तेव्हा,काहीतरी मागायच असेल तर प्रार्थना करावी लागते.

“हे स्वामी गुरू राया परब्रह्मा सद्गुरुराया,तुम्ही आमच्या आयुष्यात नेहमी सोबत रहा.आमचे सदैव संकटापासून रक्षणकरा.तुमच्यामुळे,तुमच्यासाठी आहे हे जीवन.मी तर माझ्या प्रतीने जी सेवा,जशी सेवा जमते तशी करतो.माझ्याकडून चुका पण होतात पण माझ्या मनात तुमचाच वास आहे.माझ्या सगळ्या चुकांसाठी मला क्षमा करा.माझ्या आणि माझ्या कुटुंबामागे सदैव रहा.उद्याचा दिवस तुमच्या कृपा आशिर्वादाने जाऊद्या.कोणत्याही समस्या येवू देवू नका.माझे रक्षण करा.तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद.

श्री स्वामी समर्थ” “जय जय स्वामी समर्थ” ही प्रार्थना कागदावर लिहून घ्या किंवा याचे पाठांतर करून घ्या आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी जिथे असाल तिथे म्हणा,जमलं तर स्वामींच्या समोर बसून प्रार्थना करा मग झोपी जा.

रोज ही प्रार्थना करा.मग बघा तुमच्या जीवनात काय आनंद येतो.रात्री ही प्रार्थना म्हणाल तर दुसऱ्या दिवशी तुमच्या जीवनात नवीन प्रेरणा,नवीन ऊर्जा,नवीन आत्मविश्वास घेवून येईल.नक्कीच स्वामींची कृपा तुमच्यावर होईल.

Leave a Comment