Saturday, September 30, 2023
Homeराशी-भविष्यफक्त काही दिवसातच बुध वक्री, 'या' राशींचं भाग्य चमकवणार!

फक्त काही दिवसातच बुध वक्री, ‘या’ राशींचं भाग्य चमकवणार!

मित्रांनो, वैदिक ज्योतिषशास्त्र पंडीत सांगतात की, 9 ग्रह आपल्या ठराविक वेळेनंतर आपली रास किंवा स्थिती बदलतो. म्हणजे तो एका राशीतून दुसऱ्या राशी प्रवेश करतो.

या प्रक्रिया ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह गोचर असं म्हणतात. ग्रह वेळोवेळी मार्गी आणि कधी वक्री स्थितीत जातात. या ग्रहांच्या स्थितीनुसार याचा परिणाम 12 राशींवर होतो. म्हणजेच काय आपल्या आयुष्यावर होतो. संपत्ती, बुद्धिमत्ता, व्यवसाय, वाणी आणि संवादाचा कारक बुध ग्रह या महिन्यात वक्री म्हणजे पूर्वगामी होणार आहे. त्यामुळे सर्व राशींवर याचा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. मात्र तीन राशींचं भाग्य चमकून निघणार आहे.

येत्या 24 ऑगस्टला होणार आहे. त्यामुळे तीन राशींना मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होणार आहे. जाणून घ्या तुमची रास यात आहे का?

मेष राशी
या राशीच्या लोकांसाठी बुधाची उलटी चाल अतिशय शुभदायक ठरणार आहे. या लोकांना 24 ऑगस्टनंतर काही चांगली बातमी मिळणार आहे. पर्सनल लाइफ आणि प्रोफेशनल लाइफमध्ये काही अडचण येतील पण सहज दूर होणार आहे. तुमचं लव्ह लाइफ या काळात मस्त असणार आहे. तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे. अविवाहित लोकांना लग्नाचा प्रस्ताव येणार आहे.

सिंह राशी
या राशीच्या लोकांसाठी बुध वक्री अतिशय फलदायी सिद्ध होणार आहे. या लोकांच्या करिअरच्या समस्या नाहीशा होणार आहेत. व्यवसायात तेजी येणार असून नफा मिळणार आहे. नोकरदारांना चांगली ऑफर मिळणार आहे. प्रगतीकडे तुमची वाटचाल सुरु होणार आहे. पैशाचं ओघ वाढणार आहे.

धनु राशी
बुध ग्रहाची प्रतिगामी गती धनु राशीच्या लोकांसाठी खूप जास्त भाग्यशाली ठरणार आहे. या लोकांना नशिबाची साथ मिळणार आहे. थांबलेली कामं मार्गी लागणार आहे. करिअरमध्ये यश आणि प्रगती दोन्ही तुमच्यासाठी प्रसन्न वातावरण घेऊन आला आहे. बाहेर जाण्याचा बेत आखणार आहात. धार्मिक कार्यात आवड वाढणार आहे. परदेशात शिक्षणासाठी जाण्याचं स्वप्न तुमचं पूर्ण होणार आहे.

RELATED ARTICLES

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

क्राइम

मनोरंजन