सांधेदुखीवर रामबाण उपाय, वयवाढीनंतरही म्हातारपणाची लक्षणे नाही दिसणार!

मित्रांनो, वय वाढू लागले की, सगळ्यात आधी समस्या उद्भवते ती सांधेदुखीची. वाढत्या वयात हाडे आणि सांध्यांची क्षमता कमी होऊ लागते. अशा वेळी खांदा, गुडघेदुखीच्या त्रासाने व्यक्ती त्रस्त होते. हल्ली बैठ्या कामांमध्ये वाढ झाली.

एकाच जागी बराच वेळ बसून काम केल्यानेसुद्धा सांधेदुखीच्या समस्यांमध्ये वाढ होऊ शकते. सांधे निरोगी असतील, तर वय वाढले तरीही सक्रीय राहता येते. सांध्याच्या आरोग्यासाठी काही टिप्स अंमलात आणण्याची आवश्यकता आहे.

कधीही एकाच जागी बराच वेळ बसून राहू नका. सतत आपली बसण्याची पद्धत बदलत राहा. तुमच्या बसण्याच्या स्थितीत सतत बदल करत राहा. प्रत्येक 30 ते 60 मिनिटे फेरफटका मारण्याची सवय लावून घ्या.

वजन वाढले की, वाढत्या वजनामुळे सांध्यांवर जोर पडतो. यामुळेही गुडघेदुखीचा त्रास उद्भवू शकतो. त्यामुळे वजनवाढीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.

जड व्यायामाचा सांध्यांवर खूप वाईट परिणाम होतो. त्यामुळे सायकल चालवणे, चालणे, पोहणे यासारखे हलके व्यायाम करून पाहा. हे व्यायाम प्रकार सांधे मजबूत राहण्यासाठी करणे आवश्यक आहे.

कॅल्शियम, जीवनसत्त्व डी, जीवनसत्त्व सी आणि प्रथिने यांनी समृद्ध असलेला आहार घ्या. जास्त प्रमाणात कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन करू नका. पोषक तत्त्वांनी समृद्ध आणि समतोल आहार घेणे आवश्यक आहे. मासे, माशांचे तेल यामध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड असते ज्यामुळे सांधे मजबूत राहायला मदत होते.

सांधे निरोगी राहण्यासाठी दारू आणि सिगारेटचे सेवन करू नका. यामुळे हाडांवर परिणाम होतो. याशिवाय उंच टाचांच्या चपला घालणे घालणे टाळा. त्याऐवजी आरामदायक चप्पल किंवा बूट वापरा.

सांध्यांच्या आरोग्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी पिणे आवश्यक असते. योग्य प्रमाणात पाण्याचे सेवन केल्याने शरीर सांध्यांसाठी लागणारे सायनोव्हीयल फ्लुइड तयार करते. यामुळे सांधे फ्लुइडने झाकले जातात.

Leave a Comment