कुलदेवतेला जाताना ‘ही’ एक वस्तू नक्की घेऊन जा ; कुलदेवता प्रसन्न होईल!

मित्रांनो आपल्या प्रत्येकाचे कोणते ना कोणते कुलदैवत हे असतेच. कुलदेवतेची पूजा आपण सर्वजण अगदी मनोभावे व श्रद्धेने करीत असतो. आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचणी येऊ नये तसेच घरामध्ये सुख समृद्धी नांदावी, प्रत्येक कार्यामध्ये आपणाला यश मिळावे, आपल्या घरातील प्रत्येक सदस्य हा आनंदी राहावा, पैशासंबंधी कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी आपण कुलदेवतेची पूजा करीत असतो. तसेच आपण त्यांचे दर्शन देखील घेण्यास जात असतो.मित्रांनो, प्रत्येकाची कोणती ना कोणती कुलदेवता आणि कुलदेवी ही असतेच.

तसेच घरातील स्त्रिया या कुलदेवतेची पूजा अर्चना तसेच व्रत उपवास करीत असतात. अनेक विविध वस्तू आपण कुलदेवतेला त्यांचे दर्शन घ्यायला गेल्यानंतर अर्पण करीत असतो. आपण दर्शनाला जात असताना साडी चोळी, फुले, नैवेद्य अशा अनेक प्रकारच्या वस्तू घेऊन जात असतो.
जेणेकरून आम्हाला देवतेचा कृपाशीर्वाद प्राप्त होईल. तसेच कुलदेवता ही आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपल्या सर्व अडचणी दूर करतील.

मित्रांनो आपल्यापैकी कोणाची कुलदेवता असते तर कोणाची खूप कुलदेवी असते. तर मित्रांनो तुम्ही जेव्हा आपल्या कुलदेवतेच्या दर्शनासाठी जात असता त्यावेळेस तुम्हाला मी एक वस्तू सांगणार आहे ही वस्तू तुम्ही नक्की घेऊन जायचे आहे. जेणेकरून कुलदेवतेचा कृपा आशीर्वाद तुम्हाला तसेच तुमच्या कुटुंबीयांना प्राप्त होईल.

तर मित्रांनो आपण जेव्हा कुलदेवतेच्या दर्शनाला जात असतो त्यावेळेस आपण आपल्या घरातील कुलदेवतेची मनोभावे व श्रद्धेने पूजा करून हात जोडून पूजा तसेच प्रार्थना देखील करायची आहे की, तुझ्या दर्शनासाठी तुझ्या तीर्थक्षेत्री आम्ही येत आहोत आणि आम्ही येत असताना स्वतःच्या हाताने बनवलेला नैवेद्य तुझ्यासाठी आणत आहोत. त्यामुळे तू आम्हाला तुझ्याकडे येण्याची आज्ञा दे आणि तुझा आशिर्वाद कायम आमच्या पाठीशी राहू दे.

तर मित्रांनो तुम्ही जेव्हा आपण कुलदेवतेच्या किंवा कुल देवीच्या दर्शनाला त्यांच्या तीर्थक्षेत्री जात असता त्यावेळेस तुम्हाला स्वतःच्या हाताने बनवलेला कोणताही गोड पदार्थ म्हणजेच गव्हाच्या पीठाने बनवलेला गोड पदार्थ पुऱ्या किंवा गव्हाचे पीठ आणि गुळ वापरून केलेले लाडू तुम्ही नैवेद्यासाठी घेऊन जायचे आहे. यासोबत तुम्ही गुळाची ढेप सुद्धा तुमच्या कुलदेवतेच्या नैवेद्यासाठी नक्की घेऊन जावे.

मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण असे असतात की, मंदिराच्या आवारात जी काही मिठाई किंवा पेढे असतात. हा नैवेद्य ते कुलदेवतेला अर्पण करीत असतात. परंतु मित्रांनो आपण तसे न करता स्वतःच्या हाताने बनवलेला नैवेद्य कुलदेवतेला अर्पण करणे खूपच महत्त्वाचे आहे.

आपण कुलदेवतेच्या तीर्थस्थानी गेल्यानंतर स्नान करावे आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथे जे पुजारी असतात त्यांच्याकडे आपण बनवलेला हा नैवेद्य द्यायचा आहे आणि आपण देखील मनोभावे प्रार्थना करायचे आहे की, तुझ्यासाठी मी हा अगदी प्रेमाने बनवलेला नैवेद्य आणलेला आहे आणि तो तू स्वीकार कर. असा हा नैवेद्य थोडा वेळ कुलदेवतेसमोर ठेवल्यानंतर त्याच्यातील अर्ध्या नैवेद्य आपण आपल्या घरी घेऊन यायचं आहे.

तर मित्रांनो आपण जो नैवेद्य घरी आणलेला आहे हा नैवेद्य प्रसाद म्हणून गृहन करायचा आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याने हा नैवेद्य खायचा आहे. आपण आपल्या शेजाऱ्यांना, नातेवाईकांना देखील द्यायचा आहे.
यामुळे कुलदेवता घरातील प्रत्येक व्यक्तिला प्रत्येक नकारात्मक गोष्टींपासून संरक्षण करते.आपल्या घरामध्ये सुख समृद्धी, ऐश्वर्य नांदते. कुलदेवतेचा कृपा आशीर्वाद आपल्या घरावर कायम राहील आणि कुलदेवता ही आपल्यावर प्रसन्न राहील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment