मित्रांनो स्त्री असो वा पुरुष वजन खूप वाढलेले असेल आणि विविध उपाय करून सुद्धा तुमचे वजन कमी होत नसेल, पोट सुटलेले असेल, थायरॉईडचा त्रास असेल, शरीरावर चरबी असेल तर आज आम्ही तुम्हाला एक वेट लॉस ड्रिंक सांगणार आहोत.मित्रांनो या ड्रिंकमुळे तुम्हाला 100 % फरक पडेल. बरेच वेट लॉसचे उपाय डायबेटिज किंवा थायरॉईडच्या पेशंटना करता येत नाहीत. पण आज आम्ही जो उपाय घेऊन आलोय तो कोणीही करू शकतो शिवाय नुकतीच डिलिव्हरी झालेल्या माता भगिनींना सुद्धा हा उपाय अत्यंत गुणकारी ठरणार आहे.
मित्रांनो हा उपाय केल्याने त्यांच्यावर किंवा झालेल्या बाळावर कोणताही साईड इफेक्ट होत नाही. डिलिव्हरी नंतर महिलांचे पोट लूझ होते पोटाचा घेर वाढतो. यावर अगदी जालीम असा हा उपाय आहे.मित्रांनो हे वेट लॉस ड्रिंक बनवण्यासाठी घरातीलच चार ते पाच घटक लागणार आहेत.
चला तर मग वेळ वाया न घालवता बघूया कोण कोणते घटक या ड्रिंकसाठी आवश्यक आहेत. तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला एक लिटर पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी एका टोपात गरम करायला ठेवायचं आहे. म्हणजे मित्रांनो सकाळी एकदाच हे बनवून दिवसातून तीन वेळा याचे सेवन आपल्याला करायचे आहे.
त्यासाठी आपल्याला पहिला घटक लागणार आहे तो म्हणजे दालचिनी. मित्रांनो दालचिनी हा मसाल्यातीलच एक पदार्थ आहे. शरीरातील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी दालचिनी अत्यंत उपयुक्त असते. सोबतच याच्या सेवनाने ब्लड प्रेशरचा त्रासही कमी होतो. सोबत यामुळे इन्स्टंट एनर्जी सुद्धा मिळते.
दालचिनी मुळे पोटावरील चरबी झपाट्याने कमी होते. त्यामुळे दालचिनीचा फॅट बर्नर असेही म्हणतात आणि मित्रांनो एक अखंड दालचिनीचा तुकडा आपल्याला उकळत्या पाण्यात टाकायचा आहे. तुकडा थोडा मोठा घ्यायचा आहे तो बारीक नसावा. त्यानंतर दुसरा घटक आपल्याला लागणार आहे तो म्हणजे धने. उष्णतेचे विकार, पित्ताचे विकार धन्यामुळे नाहीसे होतात.
पचन क्रिया सुरळीत होण्यासाठी धन्याचा लाख मोलाचा वाटा आहे. हृदयाचे कार्य सुरळीत ठेवण्याचे काम सुद्धा धने करते. आणि धन्यांमुळे पोटातील जंत नष्ट होतात. असे हे उपयुक्त धने आपल्याला एक चमचा त्या मिश्रणात टाकायचे आहे. धने अखंड न घेता कुस्करून घ्यावेत.
त्यानंतर आपल्याला जिरे लागणार आहे. जिरे हे अत्यंत पाचक असतात. तसेच जिऱ्यामुळे पोटातील वायू बाहेर पडतो. जिरे सुद्धा फॅट बर्नर म्हणून ओळखले जाते. तसेच ऍसि डिटी, बद्ध कोष्टता जिऱ्यामुळे नाहीशी होते. शरीरातील विषारी द्रव्य जिऱ्यामुळे बाहेर पडतात.
असे एक चमचा जिरे आपल्याला या मिश्रणात टाकायचे आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा घटक लागणार आहे तो म्हणजे इलायची. इलायची मुळे पचनक्रिया सुधारते. इलायचीला मसाल्यांची राणी असे देखील म्हणतात. तर अशी 2 इलायची आपल्याला पाण्यात सोलून सालीसकट टाकायची आहे.
पुढचा घटक आपल्याला लागणार आहे तो म्हणजे तेजपान. वेट लॉस करण्यासाठी, केस गळती थांबवण्यासाठी अत्यंत उपयुक्त. यामध्ये अँटीऑक्सीडेंट गुणधर्म असतो यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन असतात. यासाठी आपल्याला 2 तेजपान तोडून तोडून मिश्रणात टाकायचे आहेत.
असे पाचही घटक टाकून झाल्यावर ते पाणी पंधरा मिनिट चांगले उकळून द्यायचे आहे. पाणी उकळवत असताना त्यावर झाकण ठेवायचं आहे. 15 मिनिट उकळून झाल्यावर हे मिश्रण गाळून घ्यायचे आहे. आणि मित्रांनो हा काढा गाळून घेतल्यावर त्याचे 3 भाग करायचे आहेत. एक भाग सकाळी उपाशी पोटी घ्यायचा आहे.
सकाळी उपाशी पोटी घेतल्यानंतर एक तास काहीही खायचं प्यायचं नाहीये. त्यानंतर तुम्ही आहार घेऊ शकता. आणि नंतर दुपारच्या जेवणानंतर एक तासाने दुसरा भाग प्यायचा आहे. परंतु दुसरा भाग पीत असताना तो हलका कोमट करून मगच प्यायचा आहे. तिसरा भाग रात्री जेवणानंतर एक तासाने घ्यायचा आहे. रात्री सुद्धा हलके कोमट करूनच त्याचे सेवन करायचे आहे.
मित्रांनो दिवसातुन तीन वेळेस तुम्हाला हे वेट लॉस ड्रिंक प्यायचं आहे. सकाळी बनवलेले वेट लॉस ड्रिंक फ्रीज मध्ये ठेवायचं नाहीये. ड्रिंक वर थेट सूर्यप्रकाश पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. बाकी तुम्ही कुठेही हे वेट लॉस ड्रिंक ठेवू शकता आणि मित्रांनो हे ड्रिंक घेण्याच्या तिसऱ्या दिवसापासून तुम्हाला तुमच्या शरीरात फरक जाणवेल.
तुमची चरबी 100 टक्के कमी होईल. मित्रांनो या काढ्याचा दुसरा फायदा म्हणजे तुम्ही रोगप्रतिकारक शक्ती कमालीची वाढते. आणि ज्यांना ऍसिडिटीचा त्रास आहे, अपचनाचा त्रास आहे तो निघून जातो. याशिवाय तुमच्या ब्लड मधील युरिक ऍसिड यामुळे निघून जाते.
मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल ब्लड मध्ये युरिक ऍसिड वाढले तर आपणाला सांधेदुखीचा त्रास सुरु होतो आणि सर्व प्रकारच्या व्यक्ती, सर्व प्रकारच्या रोगी हे वेट लॉस ड्रिंक घेऊ शकतात. ज्या माता भगिनी गरोदर आहेत त्यांनी या काढ्याचा वापर करू नये.
डिलिव्हरी नंतर या काढ्याचा वापर करू शकता. इतर कोणीही या काढ्याचा सर्रास वापर करू शकता आणि मित्रांनो हे ड्रिंक तुमचं वजन कमी करेलच पण तुमची इम्युनिटी सुद्धा वाढवेल. तर मित्रांनो एक वेळा अवश्य हा उपाय करून बघा. पुन्हा भेटूया असाच एखादा उपाय घेऊन. तोपर्यंत निरोगी रहा आनंदी रहा.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.