Friday, September 29, 2023
Homeजरा हटकेIPL फायनलमध्ये श्रद्धा कपूरमुळे पडला पाऊस!

IPL फायनलमध्ये श्रद्धा कपूरमुळे पडला पाऊस!

आयपीएलच्या १६व्या हंगामातील अंतिम सामना गुजरात टायटन्स व चेन्नई सुपर किंग्स या संघांमध्ये २९ मे रोजी खेळवला जाणार . यंदाच्या हंगामातील हा अंतिम सामना रविवारी २८ मे अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार होता. परंतु, पावसामुळे हा सामना रद्द करावा लागला. आयपीएलचा अंतिम सामना रद्द झाल्यानंतर सोशल मीडियावर मीम्स व्हायरल झाले आहेत.

आयपीएलच्या अंतिम सामन्याला बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने हजेरी लावली होती. श्रद्धामुळे पाऊल पडला आणि सामना रद्द झाला, अशा आशयाचे मीम्स व्हायरल झाले. “जिओ सिनेमाच्या प्री मॅच शोमध्ये श्रद्धा कपूर…नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाऊस पडण्याचं कारण…” असं एका मीममध्ये म्हटलं आहे. श्रद्धाने तिच्या इन्स्टावरुन हे मीम शेअर करत हसण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत. याबरोबरच तिने मीम शेअर करत “छम छम” हे तिचं गाणंही स्टोरीला दिलं आहे.

आयपीएल फायनल रद्द झाल्यानंतर श्रद्धा कपूरवर
“जिथे जाते तिथे पाऊस पडतो”
“ओह स्त्री कल मत आना”
“आजच्या मॅचमध्ये पाऊस पडण्याचं कारण श्रद्धा कपूर आहे”
या मिमस येऊ लागल्या.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

 

श्रद्धा कपूर बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा ‘तू झुठी मै मक्कार’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला.

RELATED ARTICLES

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

क्राइम

मनोरंजन