पावसाळ्यात सकाळी उठल्याबरोबर ‘हे’ काम करा; प्रतिकारशक्ती होईल मजबूत!

मित्रांनो,मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे व्हायरस आणि बॅक्टेरियामुळे संसर्गाचा धोका वाढतोय. त्यामुळे अनेक प्रकारचे आजार पसरत आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्हाला आजारांपासून दूर राहायचे असेल तर सकाळी लवकर उठून तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला कोणत्याही रोगाचा धोका होणार नाही.

डॉक्टरांच्या मते, संसर्गजन्य रोग टाळण्यासाठी, अशा गोष्टींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते. खरंतर, एका दिवसात कोणाची प्रतिकारशक्ती वाढत नाही. त्यासाठी सातत्य असणं फार गरजेचं आहे. ही एक निरंतर प्रक्रिया आहे. म्हणूनच त्याबाबत निष्काळजीपणा करू नका. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सकाळी कोणते उपाय करावेत या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.

पावसाळ्यात फ्लूचा संसर्ग सामान्य आहे. अशा परिस्थितीत दररोज कोमट पाणी प्यायल्याने श्वसनसंसर्ग टाळता येतो. कोमट पाणी प्यायल्याने वजन कमी होते आणि खोकला, सर्दी, संसर्ग दूर होतो. कोमट पाणी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे त्वचा आणि पचनाच्या समस्यांवरही मात करता येते.

पावसाळ्यात फ्लूच्या संसर्गामुळे नाक देखील बंद होते. सायनसची अडचण गरम पाणी पिऊन किंवा त्याची थोडी वाफ घेतल्यानेही ही समस्या दूर होऊ शकते. 2008 च्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, कोमट पाणी प्यायल्याने नाकातून पाणी येणे, खोकला, घसा खवखवणे आणि थकवा यांपासून त्वरित आराम देतात.

पावसाळा आला की अन्न लवकर खराब होते, अशा परिस्थितीत पचनाचा त्रास होतो. कोमट पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. जेव्हा हे पाणी पोटातून आणि आतड्यांमधून जाते तेव्हा ते पोटातील घाण बाहेर काढण्यास मदत करते. कोमट पाणी प्यायल्याने पचनक्रिया सक्रिय होते. यामुळे चयापचय सुधारते आणि पोटाच्या समस्या दूर होतात.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दिवसाची सुरुवात काही उपायांनी केल्यास अनेक गंभीर आजारांचा धोका दूर होऊ शकतो. जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी प्यायले तर ते तुमची रोगप्रतिकारक शक्ती खूप वेगाने वाढवते आणि अनेक आजारांपासून तुमचे संरक्षण करण्याचे काम करते.

Leave a Comment