मित्रांनो आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की गुरुवार हा स्वामींना आवडणारा दिवस आहे . दर गुरुवारी स्वामींची उपासना केल्यास , त्यांची मनोभावे पूजा केल्याने स्वामींची कृपा होते. स्वामीं हे कर्मानुसार फळ देणारे देवता आहे. कर्म चांगले करत राहा स्वामीं सदैव सोबत असतात आणि मित्रांनो सुपारी हि सगळ्यांनाच माहित असते. सुपारी मध्ये गणेशाचा वास असतो , प्रत्येक ठिकाणी म्हणजेच घरात कोणतीही पूजा विधी असो , लग्न असो किंवा अन्य कोणतेही होम हवन पूजा असो तिथे गणपती च्या रूपामध्ये सुपारी चे पूजन होते. हि सुपारी पूजेच्या सामानाच्या दुकानात मिळते. मित्रांनो वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला सुपारीचा एक असा उपाय बघणार आहोत ज्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील सोबत तुम्हाला मिळेल नशिबाची साथ.
आणि मित्रांनो हा उपाय करताना काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. हा उपाय घरातच ७ दिवसांसाठी करायचा आहे. रोज ७ दिवस हा उपाय मनोभावे केला तर त्याचे फळ तुम्हाला नक्की भेटेल. आणि ह्या उपायासाठी एक नवीन कोरी पूजेची सुपारी लागेल. घरात असलेली किंवा अगोदर वापरात असलेली सुपारी तुम्हाला वापरता येणार नाही. दुकानातून नवीन कोरी सुपारी घेऊनच हा उपाय करायचा आहे. उपाय करताना प्रथम तुम्हाला त्या सुपारीला दुधाने अभिषेक करायचा आहे आणि नंतर पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि तिला स्वच्छ धुतल्यानंतरच तिचा वापर करावा. आता जो उपाय बघणार आहोत तो फक्त तुम्हाला गुरुवारच्या दिवशीच करायचा आहे.
आणि मित्रांनो सुपारी तुम्ही कधीही आणू शकता. गुरुवारी दुपारी ह्या सुपारीला सांगितल्याप्रमाणे अभिषेक करून घ्यावा. अभिषेक केल्यानंतर आपल्या घरातील देवघरामध्ये कुठेही कोणत्याहि बाजूला हि सुपारी ठेवावी.देवघरामध्ये ठेवलेल्या सुपारीचे पुढचे ७ दिवस रोज पूजन करावे , सुपारीला हळदी कुंकू अक्षदा वाहून मनोभावे पूजन करावे. धूप अगरबत्ती लावून तिची रोज आरती करावी. ७ दिवस न चुकता हि प्रक्रिया अवश्य करावी आणि ७ दिवस झाल्यानंतर ८ व्या दिवशी ती सुपारी देवघरातून घेऊन आपल्या तिजोरीमध्ये ठेवावी.
ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे सोने नाणे , पैसे , महत्वाची कागदपत्रे ठेवत असाल तिथे हि सुपारी कायमस्वरूपी ठेवून द्यावी. नंतर तिला कधी हि स्पर्श करू नये , हाथ लावू नये. तिला सतत बाहेर काढू नये. हि सुपारी तुम्ही तुमच्या दुकानात ठेवू शकता , ऑफिस मध्ये मुख्य ठिकाणी ठेवू शकता, मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही गुरुवारच्या दिवशी हा सुपारी चा छोटासा आणि सोपा असा उपाय आपल्या घरामध्ये केला तर यामुळे स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला मिळेलच आणि त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुम्हाला नशिबाचे साथ मिळण्यास सुरुवात होईल परंतु मित्रांनो हा उपाय करत असताना सर्वात महत्वाची गोष्ट जी तुम्ही लक्षात ठेवा ती म्हणजे हा उपाय तुम्हाला अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करायचा आहे.
आणि म्हणूनच मित्रांनो मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने केलेले काम हे आपल्या स्वामी समर्थांना खूपच आवडतं आणि म्हणूनच मनामध्ये कोणत्याही प्रकारची वाईट इच्छा न ठेवता आपल्याला गुरुवारच्या दिवशी हा सुपारी संबंधितचा एक छोटासा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे मित्रांनो पूजेच्या साहित्यामध्ये आणि त्याचबरोबर तंत्र मंत्र शासनामध्ये सुद्धा पूजेच्या सुपारीला खूप महत्त्व आहे म्हणूनच गुरुवारच्या दिवशी जर वर सांगितलेल्या पद्धतीने आपण सुपारीचा उपयोग केला तर त्यामुळे आपल्या वर स्वामी समर्थांची कृपादृष्टी राहील आणि त्याचबरोबर नशिबाची साथ सुद्धा आपल्याला मिळण्यास सुरुवात होईल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.