मित्रांनो प्रत्येकालाच आपल्या जीवनामध्ये काही ना काही अडचणी, संकटे ही येतच असतात. आपल्या मनातील इच्छा देखील काही वेळेस अपूर्ण राहतात. तर कुटुंबीयांच्या गरजा भागवण्यासाठी प्रत्येक जण मेहनत घेत असतो. परंतु भरपूर मेहनत घेऊन देखील आपल्याला पैसा हा अपुरा पडतो आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये सुद्धा काही ना काही वाद विवाद या ना त्याकारणाने होत राहतात.
तर आज मी तुम्हाला स्वामींची अशी एक विशेष सेवा सांगणार आहे. ही सेवा तुम्ही संध्याकाळच्या वेळेस ज्या वेळेस तुम्ही दिवा अगरबत्ती करू शकता त्यावेळेस करायचे आहे. ही स्वामींची विशेष सेवा जर तुम्ही अगदी मनोभावे आणि श्रद्धेने जर केलात तर यामुळे सर्व दुःख अडचणी तसेच इच्छा देखील पूर्ण होणार आहेत.
तर मित्रांनो बरेच जण हे स्वामींच्या केंद्रामध्ये मठांमध्ये स्वामींच्या विशेष सेवा करत असतात. तर तुम्हाला सोमवारच्या दिवशी संध्याकाळी स्वामींची ही विशेष सेवा करायची आहे. यामध्ये तुम्हाला एका प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे. या मंत्राचा जप तुम्ही दिवा अगरबत्ती केल्यानंतर करायचा आहे.
तर संध्याकाळी दिवा अगरबत्ती झाल्यानंतर तुम्हाला हात जोडून स्वामींच्या समोर प्रार्थना करायची आहे. जी काही दुःख अडचण आहे ते स्वामींना सांगायचे आहे. तसेच ज्या काही मनातील इच्छा असेल ते स्वामींना पूर्ण करण्याची प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला या मंत्राचा जप एक माळ करायचा आहे. हा स्वामींचा खूपच प्रभावशाली असा मंत्र आहे. तर मित्रांनो तो मंत्र म्हणजेच
ॐ त्रिकालतितत्रिकालज्ञानिने नमः
तर या मंत्राचा तुम्हाला जर एक माळ करायचा आहे आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप एक माळ करायचा आहे. अशाप्रकारे तुम्ही या दोन मंत्रांचा जप एकेक माळ असा करायचा आहे.
तर सोमवारच्या दिवशी स्वामींची ही विशेष सेवा तुम्ही जर केला तर यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत आणि तुमचे दुःख अडचणी सर्व काही स्वामी महाराज दूर करणार आहेत आणि स्वामींचा कृपाशीर्वाद तुमच्यावर तसेच तुमच्या कुटुंबीयांवर सदैव राहणार आहे. तर स्वामींची ही विशेष सेवा तुम्ही सोमवारच्या दिवशी संध्याकाळी अवश्य करायचे आहे.