जसे लवकर उठण्याचे फायदे आहेत तसेच लवकर झापण्याचेही फायदे आहेत. घरातील मोठे वडिलधारी व्यक्ती देखील लवकर झोपण्याचा सल्ला देतात. वास्तुशास्त्रात देखील कोण्यात्या दिशेने झोपावे आणि किती वाजता झोपावे याबाबत काही नियम सांगितलेले आहे.
सकाळी बेडवरुन उठताना उजव्या बाजूने उठावे. अचानक अंथरुण सोडल्याने हृदयावर दबाव येतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढु शकतो. वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्यावर प्रथम नतमस्तक होऊन पृथ्वीला स्पर्श करावा, त्यानंतर पाय जमिनीवर ठेवावे. शास्त्राचा हा नियमही विज्ञानाच्या याच तत्त्वावर आधारित आहे.
सूर्यास्तानंतर सुमारे तीन तासांनी झोपले पाहिजे. झोपताना तुमचे डोके भिंतीपासून किमान तीन हात दूर असले पाहिजे. वास्तुनुसार संध्याकाळी झोपणे शुभ मानले जात नाही. तसेच आरोग्यावर देखील त्याचा परिणाम होउ शकतो.
वास्तुनुसार असे सांगण्यात आले आहे की, झोपताना दिशेची काळजी घेणे गरजेचे आहे. नेहमी पूर्व किंवा दक्षिण दिशेला डोके ठेवून झोपावे. यामुळे संपत्ती आणि वय वाढते.तसेच, कधीच पश्चिम आणि उत्तरेकडे तोंड करून झोपू नये. कारण यामुळे आजार वाढण्याची शक्यता असते.
आरोग्य आणि वास्तू या दोन्ही दृष्टिकोनातून सोफ्यावर झोपणे टाळावे. बेडवर बसून जेवणे अशुभ मानले जाते.
झोपताना कपाळावर टिळाही लावू नये. झोपतांना मोबाईल पाहणे टाळावे.घरात मोराचे पिसे ठेवणे खूप शुभ मानले जाते, असे मानले जाते की मोराचे पिसे घरात ठेवल्याने कधीच आर्थिक समस्या उद्भवत नाही. रात्री उशाखाली मोराचे पिस ठेवून झोपला तर तुमची प्रगती खूप लवकर होते. जीवनात शांती आणि आनंद येतो.
तुमच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असेल तर त्यासाठी तुम्ही मूग डाळीचा वापर करू शकता. रात्री झोपण्यापूर्वी मूग उशीखाली हिरव्या कपड्यात ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर गरजूंना दान करा. असे केल्याने तुम्हाला संपत्तीही मिळते तसेच तुमच्या जीवनसाथीसोबतचे नाते मधुर होते.
झोपण्यापूर्वी तांब्याचे भांडे पाण्याने भरून ठेवा आणि सकाळी हे पाणी प्या, किंवा तुम्ही चेहराही धुवू शकता. असे केल्याने चेहऱ्याची चमक वाढते आणि व्यवसायातही प्रगती होते.
पैसा आहे पण खिशात टिकत नाही, अशा लोकांनी झोपण्यापूर्वी उशाखाली लसणाची पाकळी ठेवावी. असे केल्याने घरात पैसा तुमच्याकडे साठू लागेल.
तुम्हाला झोपेचा त्रास होत असेल तर उशाखाली सुगंधी फुले ठेवून झोपावे. असे केल्याने तुम्हाला चांगली झोप लागेल आणि तुमचे वैवाहिक जीवन देखील आनंदी राहील.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.