दोन मिनिटात दात दुखीची समस्या घालवण्याचा खास घरगुती उपाय!

मित्रांनो आजकाल बऱ्याच जणांना दातांच्या बाबतीत खूप सार्‍या अडचणींना सामोरे जावे लागते. म्हणजेच अनेकांना दातदुखीची समस्या भेडसावताना आपल्याला पाहायला मिळतेच. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला दातदुखीच्या समस्येने खूपच ते त्रस्त झालेली असतात. लहान मुले हे चॉकलेटचा अति प्रमाणात वापर करतात. तसेच आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये जंकफूडचा आपल्या आहारामध्ये जास्त समावेश असल्याकारणाने आपल्या दातांना कीड लागते आणि ज्या वेळेस आपल्या दातांना कीड लागते त्यावेळेस त्याच्या वेदना खूपच आपल्याला होत असतात. त्यामुळे हिरड्यांना सूज येणे तसेच काहीही खायला न येणे अशा प्रकारच्या अनेक समस्या आपल्या पुढे निर्माण होतात.

तर मित्रांनो आज मी तुम्हाला असा काही घरगुती उपाय सांगणार आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर तुमची दात दुखीची समस्या आहे ती पूर्णपणे निघून जाणार आहे. तसे तर आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊन अनेक प्रकारच्या त्यावरती औषधेही घेत असतो. तरीदेखील आपल्या या दात दुखीची समस्येने आपणाला सुटका मिळत नाही. तर मित्रांनो हा उपाय जर तुम्हाला दात दुखीची काही समस्या असेल तर अवश्य करून पहा. तर मित्रांनो या उपायासाठी आपणाला तुरटी लागणार आहे.

म्हणजेच आपल्याला छोटासा तुरटीचा तुकडा घेऊन त्याची पावडर बनवायची आहे आणि ही पावडर आपणाला अर्धा चमचा घ्यायची आहे. मित्रांनो जर आपल्याला दात किडल्यानंतर ज्या काही वेदना होत असतील या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी तुरटीची पावडर खूपच फायदेशीर ठरते. तर अर्धा चमचा आपल्याला तुरटीची पावडर घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला मोहरीचे तेल घ्यायचे आहे. तर मित्रांनो अर्ध्या चमच्याचे निम्मे आपल्याला घ्यायचे आहे.

नंतर आपणाला यामध्ये हळद ही देखील अर्ध्या चमच्याचे निम्मे घ्यायचे आहे. म्हणजेच एक चौथाई भाग आपल्याला घ्यायचे आहे. हळद हे देखील आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर ठरते. तसेच आपल्याला यामध्ये दुसरा जो पदार्थ ऍड करायचा आहे तो आहे सैंधव मीठ. हे देखील आपल्याला एक चौथाई भाग म्हणजेच अर्ध्या चमच्याच्या निम्मे आपल्याला सैंधव मीठ देखील घ्यायचा आहे.

जर मित्रांनो तुम्हाला दात किडला असेल तर त्यामुळे आपल्या हिरड्यांना सूज देखील येते आणि ही सूज कमी करण्यासाठी आपणाला सेंधव मीठ खूपच फायदेशीर ठरते. तर मित्रांनो अर्धा चमचा आपल्याला तुरटीची पावडर घ्यायची आहे आणि एक चौथाई भाग हळद एक चौथाई भाग मोहरीचे तेल आणि एक चौथाई भाग आपला सेंधव मीठ घ्यायचे आहे आणि हे व्यवस्थित मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला कापसाच्या साह्याने म्हणजे थोडासा कापूस घ्यायचा आहे आणि तो त्या मिश्रणामध्ये बुडवायचा आहे.

आणि आपल्याला ज्या ठिकाणी आपला दात किडलेला असेल किंवा आपली दात दुखी ची समस्या असेल त्या ठिकाणी तुम्हाला तो बोळा ठेवायचा आहे आणि दाताने दाबायचा आहे. थोडा वेळ आपल्याला हा बोळा कापसाचे बोळा तसेच आपल्या दातांमध्ये धरायचा आहे. जर तुम्हाला वरच्या साईडचा जर दात किडलेला असेल आणि त्याच्या वेदना होत असतील तर तुम्ही ब्रश घ्यायचा आहे आणि ब्रश तो त्या मिश्रणामध्ये बुडवायचा आहे आणि वरच्या साईडला जो दात किडलेले आहे त्या ठिकाणी आपल्याला ब्रश फिरवायचा आहे.

थोडा थोडा दाबायचं देखील आहे. यामुळे देखील आपली जी काही दात दुखीची समस्या असेल किंवा दाताना कीड लागल्यामुळे आपल्याला जो होणारा त्रास असतो हा त्रास नक्कीच कमी होतो. त्याचप्रमाणे मित्रांनो जर तुम्हाला खूप सारे वेदना होत असतील आणि त्यावेळेस हा उपाय करण्यास वेळ जात असेल मग तुम्ही एक चार-पाच लवंगा घ्यायचे आहेत आणि या लवंगा आपल्या दातांमध्ये तशाच धरायचे आहेत किंवा तुम्ही या लवंगाची पावडर देखील करू शकता आणि ही पावडर देखील आपल्या दातांमध्ये तुम्ही धरू शकता.

यामुळे देखील तुमची दात दुखण्याची समस्या आहे ती नक्कीच दूर होईल. तर मित्रांनो असा हा घरगुती उपाय जर तुम्ही घरच्या घरी केला तर यामुळे तुमची दात दुखीची समस्या दोन मिनिटात कमी होईल. तर असा हा घरगुती उपाय तुम्ही एक वेळ अवश्य करून पहा. याचा कोणताही साईड इफेक्ट देखील तुम्हाला होणार नाही. उलट दात दुखी पासून जो काही त्रास तुम्हाला होत होता यातून तुमची सुटका नक्कीच होईल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

 

Leave a Comment