अधिक महिन्यात मनातील इच्छा बोलून स्वामींची करा ही सेवा जे हवं ते मिळेल!

मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. श्रावण महिन्यामध्ये अनेक लोक हे सोमवारचे व्रत करीत असतात आणि उपवास करून महादेवांना प्रसन्न करण्याचे प्रयत्न त्यांचे चालू असतात. तर यावर्षी अधिक श्रावण आल्याकारणाने दोन महिन्यांचा श्रावण महिना असणार आहे. तर 18 जुलैला अधिक श्रावण लागणार आहे. तो 16 ऑगस्टपर्यंत असणार आहे.

म्हणजेच एक महिन्यांचा अधिक श्रवण असणार आहे आणि त्यानंतर मग एक महिन्यांचा नीज श्रावण असणार आहे. तर श्रावण सोमवारची व्रत हे आपण श्रावण मध्ये करायचे आहेत. अधिक श्रावणमध्ये मात्र आपण सर्व नियमांचे पालन करायचे आहे. अधिक श्रावण महिन्यामध्ये जावयांना वान दिले जाते.

तसेच अनेक वस्तूंचे दान देखील या महिन्यांमध्ये केले जातात. म्हणजेच पुण्याची अधिक प्राप्ती करण्यासाठी अनेक दान देखील केले जाते. तर अधिक श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला स्वामींची एक अशी विशेष सेवा करायची आहे ज्यामुळे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहेत आणि जे तुम्हाला जीवनामध्ये हव आहे ते सर्व काही मिळणार आहे.

तर ही जी सेवा आहे ही सेवा तुम्हाला १८ जुलैपासून चालू करायची आहे. ते 16 ऑगस्टपर्यंत करायचे आहे. म्हणजे 16 ऑगस्ट हा शेवटचा तुमचा दिवस असणार आहे आणि ही सेवा तुम्ही संध्याकाळी किंवा सकाळच्या वेळी कधीही करू शकता. म्हणजे तुम्हाला जर सकाळी वेळ असेल तर सकाळी संध्याकाळी जर वेळ असेल तर संध्याकाळी करू शकता.

तर सकाळच्या वेळेस तुमची ज्यावेळेस देवपूजा वगैरे आटोपेल त्यावेळेस तुम्ही स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर बसायचे आहे. हात जोडायचे आहे आणि जे काही इच्छा असेल ते सर्व काही स्वामींना सांगायचे आहेत. तसेच तुम्हाला जीवनामध्ये जे हव आहे ते स्वामींना बोलायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला विष्णूंचा नाम जप करायचा आहे. म्हणजेच विष्णूचा मंत्र जप तुम्हाला बोलायचं आहे.

ओम नमो नारायणा या मंत्राचा जप तुम्हाला एक माळ करायचा आहे. त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप एक माळ करायचा आहे आणि तुम्हाला नित्यसेवा या पोथी मधील श्री रामरक्षा एक वेळेस वाचायचे आहे. या तीन गोष्टी तुम्हाला दररोज न चुकता अधिक महिना करायचे आहे.

म्हणजेच अधिक श्रावण 18 जुलैपासून चालू होईल तेव्हापासून तुम्हाला ही सेवा चालू ठेवायची आहे आणि 16 ऑगस्टपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे. या तीन गोष्टी स्वामींच्या सेवेमध्ये करायचे आहेत. यामुळे तुमच्या मनातील इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतील आणि तुम्हाला जीवनामध्ये जे हव आहे ते सर्व काही स्वामी महाराज देणार आहेत. तर अधिक श्रावण महिन्यामध्ये ही स्वामींची विशेष सेवा तुम्ही अवश्य करा.

Leave a Comment