14 जुलै मोठा शुक्रवार स्वामींची विशेष सेवा सर्व अडचणी होतील दूर, इच्छा होतील पूर्ण!

मित्रांनो आपण स्वामींच्या अनेक सेवा, मंत्रजप करीत असतो. जेणेकरून आपल्या जीवनातील अडचणी, इच्छा या पूर्ण होतील. परंतु काही वेळेस आपल्याला खूपच अडचणींचा संकटांचा सामना करावा लागतो आणि आपल्या इच्छा या अपूर्ण राहतात. तसेच अडचणी देखील कमी होत नाहीत. तर आज मी तुम्हाला शुक्रवारची स्वामींची एक विशेष सेवा सांगणार आहे. यामध्ये तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस स्वामींचा एक मंत्र जप करायचा आहे.

तर ज्यावेळेस तुम्ही संध्याकाळी दिवा अगरबत्ती करतात त्यावेळेस तुम्हाला स्वामींचा हा प्रभावशाली मंत्र एक माळ करायचा आहे. संध्याकाळी दिवा अगरबत्ती केल्यानंतर हात जोडून स्वामीपुढे बसायचे आहे आणि ज्या काही अडचणी असतील, समस्या असतील तर स्वामींना सांगायचे आहेत. तसेच या दूर व्हाव्यात अशी प्रार्थना करायची आहे. जी काही इच्छा असेल ती देखील बोलून दाखवायचे आहे आणि नंतर या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. तर तो मंत्र काहीसा असा आहे,
ॐ चितंनातीतसंदेहदर्शनदायकाय नमः

तर या मंत्राचा जप तुम्हाला एक माळ करायचा आहे आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप एक माळ करायचा आहे. म्हणजे आसे हे दोन प्रभावशाली मंत्र जप तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळी करायचे आहे. त्यामुळे तुमच्या सर्व अडचणी दूर होतील आणि स्वामींचा कृपा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि इच्छा देखील तुमच्या पूर्ण होतील.

Leave a Comment