अधिक महिन्यात विवाहित स्त्रियांनी आपल्या आईची भरावी ओटी, सुख सौभाग्य प्राप्त होईल!

मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक रूढी परंपरा ह्या पूर्वीपासूनच चालत आलेले आहेत आणि आज देखील आपणाला अनेक लोक हे या परंपरांचे पालन करीत असताना दिसतात. तर काही लोक याच्याकडे अंधश्रद्धा म्हणून लक्षही देत नाहीत. परंतु मित्रांनो या परंपरा मागे काही ना काही गुपित हे दडलेले असते. त्यामुळे आपण देखील या परंपरांचे पालन करणे खूपच गरजेचे आहे.

तर यावर्षी अधिक महिना आलेला आहे. त्यामुळे दोन महिन्यांचा श्रावण असणार आहे. तर 18 जुलैला अधिक श्रावण लागणार आहे. अधिक श्रावण महिन्यामध्ये अनेक पूजा विधी केल्या जातात. तसेच जावई यांना दान दिले जाते. दानधर्म केल्याने देखील पुण्याची प्राप्ती होते. त्यामुळे अनेक जण हे काही वस्तूंचे दान देखील करत असतात. दिव्यांचे दान करणे हे देखील खूपच शुभ मानले गेलेले आहे.

तर अधिक श्रावण महिन्यामध्ये विवाहित स्त्रियांना एक काम करायचे आहे. यामुळे त्यांच्या जीवनामध्ये सुख आणि सौभाग्याची प्राप्ती त्यांना होणार आहे. तर अधिक श्रावण हा 18 जुलैला लागणार आहे. या अधिक महिन्यांमध्ये तुम्हाला हे काम अवश्य करायचे आहे. घरातील विवाहित स्त्रियांनी आपल्या आईची ओटी भरायची आहे. जर तुमची आई आपल्या जवळ नसेल तर तुम्ही आपल्या कुलदेवतेची किंवा आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा फोटो असेल किंवा इतर कोणत्याही देवीच्या मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यांची तुम्ही ओटी भरू शकता.

किंवा तुम्ही ज्या देवींना मानता त्या देवीची देखील ओटी भरली तरीही चालते. तर विवाहित स्त्रियांनी श्रावण महिन्यामध्ये आपल्या आईची ओटी भरायचे आहे. जर तुम्ही आपल्या कुलदेवतेची ओटी भरणार असाल तर एक पाठ मांडून आपल्याला कुलदेवतेचा फोटो ठेवून हळदीकुंकू लावून आपणाला एक साडी, ब्लाउज पीस, नारळ आणि गहू किंवा तांदूळ घेऊन आपल्या आईची ओटी भरायची आहे.

जर आई जवळ नसल्यास तुम्ही आपल्या कुलदेवीची ओटी भरायचे आहे आणि जे तांदूळ वगैरे आहे हे तांदूळ तुम्ही गाईला खाऊ घालू शकता आणि जो नारळ आहे हा नारळ तुम्ही कोणाला दान करू शकता किंवा तुम्ही तो मंदिरात जाऊन ठेवून देऊ शकता आणि जे ब्लाउज किंवा साडी असेल ते साडी ब्लाउज पीस ज्या महिलेने आपल्या कुलदेवतेची ओटी भरलेली आहे त्या विवाहित स्त्रीने ते ब्लाउज आणि साडी वापरायचे आहे.

जर आई जवळ असेल तर तुम्ही आईची ओटी भरायची आहे आणि आईला ते साडी आणि ब्लाऊज द्यायचे आहे. आई जवळ नसेल तर कुलदेवीची ओटी भरायची आहे आणि अशा पद्धतीने साहित्य तुम्ही व्यवस्थित हाताळायचे आहे.

तर अशा पद्धतीने जर तुम्ही श्रावण महिन्यात म्हणजेच अधिक श्रावण महिन्यात आपल्या आईची ओटी भरला तर यामुळे तुम्हाला सुखाची तसेच सौभाग्याची प्राप्ती नक्कीच होणार आहे. त्यामुळे विवाहित स्त्रियांनी अवश्य अधिक महिन्यांमध्ये आपल्या आईची ओटी अवश्य भरायची आहे.

Leave a Comment