12 जुलै मोठा बुधवार स्वामींची विशेष सेवा; सर्व दुःख अडचणी होतील दूर!

मित्रांनो प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही दुःख अडचणी येत असतील म्हणजेच काही वेळेस आपल्याला इतक्या अनेक संकटांचा सामना करावा लागतो की आपल्याला जीवन देखील नकोसे होते. खूपच त्रास आपल्याला सहन करावा लागतो. कोणताही मार्ग मिळत नसल्या कारणाने आपण खूपच निराश होतो. तर आपल्यापैकी बरेच जण हे स्वामींचे सेवेकरी आहेतच आणि स्वामींच्या केंद्रामध्ये मठांमध्ये जाऊन स्वामींची विशेष सेवा करीत असतात.

प्रत्येक अडचणीवर स्वामींची वेगवेगळी सेवा सांगण्यात आलेली आहे. त्यानुसार आपण जर मनोभावे आणि श्रद्धेने स्वामींची सेवा केली तर आपले सर्व दुःख, अडचण, संकट स्वामी महाराज दूर करतात. तर 12 जुलै बुधवारच्या दिवशी स्वामींची तुम्ही एक विशेष सेवा केला तर त्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व दुःख, अडचणी नक्कीच स्वामी महाराज दूर करतील.

तसेच आपल्याला आलेल्या अनेक अडचणीतून आपणाला बाहेर काढतील. आपणाला मार्ग दाखवतील. तर हे स्वामींची जी विशेष सेवा आहे ही बुधवारच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला करायची आहे. यामध्ये एक प्रभावशाली मंत्राचा जप आपल्याला एक माळ करायचा आहे. तर संध्याकाळच्या वेळेस ज्या वेळेस आपण दिवा अगरबत्ती करतो त्यावेळेस आपल्याला देवघरासमोर बसून स्वामींना नमस्कार करायचा आहे आणि जे काही दुःख अडचण असतील ते सर्व काही स्वामींना सांगायचे आहे.

त्यानंतर अगदी मनोभावेने श्रद्धेने प्रार्थना करायचे आहे. नमस्कार करून झाल्यानंतर तुम्हाला या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे. तो चमत्कारिक प्रभावशाली असा मंत्र काहीसा असा आहे,
ॐ बंधनातीत भक्तिकिरणबंधनाय नमः

तर या मंत्राचा एक माळ तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप एक माळ करायचा आहे. तर अशा पद्धतीने हे दोन मंत्र जप तुम्ही बुधवारच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस केला तरी यामुळे तुमच्या जीवनातील सर्व दुःख निघून जातील. अडचणीतून तुम्हाला मार्ग सापडेल. स्वामी महाराज सदैव तुमच्या पाठीशी उभे राहतील. तर अशी ही बुधवारची विशेष सेवा तुम्ही देखील अवश्य करून पहा. तुम्हाला देखील स्वामी अनुभव नक्कीच येतील.

Leave a Comment