स्वामी तुमच्या घरी येतात याचे काही संकेत नक्की जाणून घ्या!

मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण हे स्वामींचे भक्त आहेत अगदी नित्यनेमाने विधिवतपणे स्वामींच्या सेवा पूजा अर्चना ते करीत असतात. परंतु प्रत्येक भक्ताला स्वामींचा अनुभव येईलच असे नसते. काही भक्तांना अनुभव देखील आलेले आहेत. तर मग बरेच जण काय म्हणतात की मी एवढी स्वामींची पूजा करतो सेवा करतो परंतु स्वामींची आम्हाला प्रचिती आलेली नाहीये. तसेच स्वामी आमच्या घरांमध्ये आहेत का याचे देखील काहीच आम्हाला माहिती नाही. स्वामी आमच्या पाठीशी आहेत का याबद्दल कोणतीच आम्हाला माहिती नाहीये. म्हणजेच स्वामी आमच्याबरोबर आहेत की नाहीत हे कसे ओळखावे?

तर मित्रांनो आपल्या घरामध्ये स्वामी असण्याचे म्हणजेच आपल्या घरी स्वामींचे वास्तव्य असण्याचे काही संकेत आज मी तुम्हाला सांगणार आहे. या संकेतावरून तुम्ही ओळखू शकता की स्वामी आपल्या घरामध्ये आहेत. ते आपल्या पाठीशी आहेत. तर हे संकेत नेमके कोणते आहेत? चला तर जाणून घेऊयात.

तर मित्रांनो बरेचजण आपण अगदी मनोभावे श्रद्धेने स्वामींच्या पूजेमध्ये मग्न राहतात. स्वामींच्या मंत्रांचा जप करीत असतात. तर बऱ्याच वेळा असे घडते की अनेक गोष्टी या घडण्याअगोदर आपणाला कळतात म्हणजेच आता आपल्या जीवनामध्ये हे घडणार आहे याची थोडी ना थोडी आपल्याला जाणू जाणीव होते आणि हाच संकेत स्वामी आपल्या घरामध्ये वास्तव्यास आहेत हे नक्की.

म्हणजेच पुढे घडणाऱ्या गोष्टींची चाहूल जर आपणाला लागत असेल अगोदर तर स्वामी हे आपल्यात आहेत स्वामीं आपल्या घरामध्ये वास्तव्य करीत आहेत हे नक्की समजून जा. तसेच बऱ्याच वेळा काय होते की जे आपण बोलतो ते लगेच सत्यामध्ये उतरते. म्हणजेच जे आपण बोलतो ते नक्कीच खरे होते. बरेच जण म्हणतात की हा योगायोग आहे.

परंतु मित्रांनो तसे नाही. आपण पूजा करताना स्वामींचा मंत्र जप करतो तशी आपली वाच्यता होत राहते. म्हणजेच आपल्या मुखातून आपोआप मंत्र जप बाहेर पडतात आणि हीच वाच्यता आपल्याला स्वामींकडून प्राप्त होते. म्हणजेच आपल्याला बोलण्याची ताकद ही स्वामींकडूनच प्राप्त होते. मग ही आपली वाच्यता जी आहे ही आपल्या ब्रम्हांडापर्यंत देखील पोहोचते आणि आपण जे बोलतो ते नक्कीच आपले खरे होते.

हे देखील होण्यामागे स्वामींचा आशीर्वाद असतो म्हणजेच स्वामी आपल्या घरामध्ये आहेत आपल्या पाठीशी आहे त्यांचा कृपाशीर्वाद आपल्यावर आहे हे त्यावेळेस तुम्ही समजून जा.

म्हणजेच नामस्मरणाने आपल्या जिभेला एक शक्ती प्राप्त होते आणि ही शक्ती आपल्या ब्रम्हांडापर्यंत देखील पोहोचते त्यामुळे आपण जे बोलतो ते खरे होते.

तसेच मित्रांनो आपल्या जीवनामध्ये अनेक सुखदुःखे ही येतच राहतात. बऱ्याच वेळा भरपूर मोठमोठी संकटे अडचणी येत राहतात. त्यावेळेस आपल्याला काय करावे हे सुचत नाही. म्हणजेच आपल्याला त्यातून मार्ग देखील मिळत नाही. अशा वेळेस एखादा तिसरा व्यक्ती येऊन आपली मदत करतो. म्हणजेच त्या अडचणीतून आपणाला बाहेर काढतो.

त्यावेळेस तुम्ही नक्की समजून जा की स्वामी आपल्याबरोबर आहेत. त्यांचे वास्तव्य आपल्या घरामध्ये आहे. म्हणजेच आपल्याला कोणताही मार्ग सापडत नसेल त्यावेळेस एखाद्या व्यक्तीने आपल्याला मदत केली. जो अनोळखी आहे अशा व्यक्तीने आपल्याला गरज केली तर हा संकेत म्हणजेच स्वामी समर्थ महाराज आपल्याबरोबर आहेत.

तसेच मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्या मनात जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होते म्हणजेच आपण त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणतेही परिश्रम घेत नाही किंवा ती इच्छा पूर्ण होण्यासाठी कोणत्याही प्रकारची जास्तीत जास्त मेहनत देखील आपणाला घ्यावी लागत नाही. अशा इच्छा आपल्या पूर्ण होतात. त्यावेळी देखील तुम्ही समजून जा की स्वामी समर्थ महाराज हे आपल्या घरामध्ये वास्तव्यास आहेत. ते आपल्या पाठीशी आहेत.

मित्रांनो एखादा माणूस श्रीमंत असेल म्हणजेच त्याच्याकडे कोणत्याही प्रकारची कमतरता नाही परंतु अशा व्यक्तीला जर रात्रीची झोप शांत लागत नसेल म्हणजेच तो सतत अस्वस्थ असेल आणि एखाद्या गरीब व्यक्ती त्याच्याकडे जे आहे त्यात समाधानी मानून तो हसत आपले जीवन जगत असेल म्हणजे त्यांना भरपूर संकटे आहेत अडचणी आहेत तरी देखील तो दोन घास सुखाचे खात असेल आणि आपल्या जीवनामध्ये अगदी सुखी असेल तर त्यावेळेस मात्र तुम्ही समजून जा की स्वामी शक्ती आपल्या सोबत आहे.

म्हणजेच भरपूर संकटे असताना देखील आपण सुखी जीवन जगत असो म्हणजेच रात्रीची झोप आपल्याला शांत लागत असेल तर स्वामी आपल्या पाठीशी असतात हा त्यामागचा संकेत असतो.

तर मित्रांनो वरील सांगितलेल्या या संकेता वरून तुम्ही नक्की समजून जा की स्वामी समर्थ महाराज हे आपल्या सोबत आहेत. म्हणजेच अनेक जणांना प्रश्न निर्माण होतात की मी एवढी सेवा करून देखील मला अनुभव येत नाहीत प्रचिती येत नाही स्वामी माझ्याबरोबर आहेत की नाहीत हे माहिती नाही. तर मित्रांनो वरील हे संकेत तुम्हाला जाणवून देतील की स्वामी समर्थ महाराज हे तुमच्या सोबत आहेत. तुमच्या घरांमध्ये वास्तव्य करीत आहेत. असे जर संकेत तुम्हाला मिळाले तर स्वामी समर्थ महाराज तुमच्या पाठीशी आहेत हे नक्की समजून जा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment