मित्रांनो अनेक जण हे मठामध्ये किंवा स्वामींचे केंद्रामध्ये जाऊन स्वामींचे सेवा करण्यामध्ये व्यस्त असतात. तसेच अनेक मंत्रांचा जप करीत असतात. तसेच आपणाला केंद्रामध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या अडचणीवर वेगवेगळ्या स्वामींच्या सेवा सांगितल्या जातात आणि प्रत्येक भक्त त्या अगदी मनोभावे आणि श्रद्धेने करीत असतात. जेणेकरून आपल्या अडचणीतून स्वामी महाराज आपणाला बाहेर काढतील आणि त्यांचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल.
तर स्वामींचे बरेचसे भक्त असे आहेत त्यांना मठांमध्ये जाणे शक्य नसते त्यावेळेस ते आपल्या घरामध्ये स्वामींची सेवा, मंत्र जप हे करीतच असतात. तर आज मी तुम्हाला स्वामींची रविवारची एक विशेष सेवा सांगणार आहे. ही सेवा तुम्ही सकाळच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळेस करू शकता. ही सेवा जर तुम्ही मनापासून केली तर यामुळे तुमच्या सर्व काही अडीअडचणी असतील त्या सर्व दूर होतील.
तसेच तुमच्या मनी असलेली इच्छा देखील स्वामी महाराज पूर्ण करतील आणि तुमची प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू राहील. तर या सेवेमध्ये तुम्हाला स्वामी महाराजांचा मंत्र जप करायचा आहे. या मंत्र जपाने तुमच्या सर्व अडचणी, संकटे नक्कीच दूर होणार आहेत. तर तुम्ही संध्याकाळच्या वेळेस दिवा, अगरबत्ती करतात त्यावेळेस दिवा अगरबत्ती केल्यानंतर या मंत्राचा जप करायचा आहे.
पहिल्यांदा हात पाय स्वच्छ धुवून घेऊन तुम्ही देवघरासमोर बसायचे आहे. स्वामींच्या मूर्ती समोर किंवा फोटो असेल तर फोटो समोर देखील तुम्ही बसू शकता. तुम्हाला दिवा अगरबत्ती लावायची आहे आणि या चमत्कारिक मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र म्हणजेच
ओम सुकोमलपादाबुजाय नमः
या मंत्राचा जप तुम्हाला एक माळ म्हणजेच 108 वेळा करायचा आहे. या मंत्राचा जप केल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. अशाप्रकारे हे दोन मंत्र अगदी मनोभावे, श्रद्धेने करायचा आहे आणि तुमच्या ज्या काही अडीअडचणी असतील किंवा मनातील इच्छा असेल ती स्वामी समोर बोलून मन तुमचे हलके करायचे आहे.
म्हणजेच अडचणी इच्छा या सर्व स्वामींना सांगायच्या आहेत आणि नमस्कार करायचा आहे. मित्रांनो ही जर सेवा तुम्ही रविवारी संध्याकाळच्या वेळेस केली तरी यामुळे तुमचे नक्कीच संकटे दूर होतील आणि तुमच्या इच्छा देखील स्वामी महाराज पूर्ण करतील. तर अशी ही रविवारची विशेष सेवा तुम्ही अवश्य करून पहा.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.