श्रावणातल्या पहिल्या सोमवारी जुळून आलाय शुभ योग ! या राशींची होणार चांदी,अनेक इच्छा पूर्ण

हिंदू धर्मात श्रावण मास हा अधिक शुभ व पावित्र्याचा मानला जातो. या महिन्यात अनेक धार्मिक कार्य केले जाते. उत्तर भारतात श्रावण मास आरंभ झाला आहे तर महाराष्ट्रात १८ जुलैनंतर सुरु होणार आहे.

यंदा श्रावण मास हा ५९ दिवसांचा असून यादरम्यान ८ श्रावणी सोमवार येतील. यावर्षी भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी आपल्याकडे चांगली संधी आहे. यंदा श्रावणात अधिक मासाचा दुर्मिळ योग तब्बल १९ वर्षानंतर जुळून आला आहे. त्यातच आज श्रावणी सोमवारीही एक अतिशय शुभ योगायोग होत आहे.

या शुभ संयोगामुळे रुद्राभिषेक आणि विधीपूर्वक पूजा केल्यास भरपूर लाभ मिळतील. मात्र, श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी पंचक निर्माण झाल्यामुळे अनेकांच्या मनात रुद्राभिषेक आणि पूजेबाबत लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.

साधारणपणे पंचक आणि भद्र काळात शुभ कार्य आणि पूजा करणे चांगले मानले जात नाही, परंतु जर श्रावण मासात पंचक किंवा भद्र काळ असेल तर त्या काळात पूजा करताना कोणतेही अडचण येणार नाही. कारण भगवान शिव हे काळाचे महाकाल आहेत आणि सर्व ग्रह आणि नक्षत्र त्यांच्या अधीन असतात. म्हणूनच पंचकानंतरही श्रावण सोमवारी पूजाविधी कोणत्याही अडथळ्याशिवाय करता येतात.

श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी गजकेसरी राजयोग तयार झाला आहे. आज चंद्र आणि गुरू एकत्र मीन राशीत असल्यामुळे गजकेसरी योग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रात गजकेसरी योग अत्यंत शुभ मानला जातो. या योगात केलेली पूजा, विधी, शुभ कार्य चांगले फळ देतात. यासोबतच मिथुन, सिंह, तूळ, धनु आणि मीन राशीच्या लोकांसाठी हा गजकेसरी राजयोग अतिशय शुभ राहील. या 5 राशीच्या लोकांना अमाप संपत्ती आणि मोठे यश मिळण्याची शक्यता आहे.

भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यात पाणी, उसाचा रस, गंगेचे पाणी, दूध, दही, तूप आणि मधाने शिवलिंगाचा अभिषेक करा. असे केल्याने जीवनात अपार सुख-समृद्धी येते व सर्व संकटे दूर होतात.

Leave a Comment