मित्रांनो आजकाल आपण बऱ्याच ठिकाणी घरात, दुकानात, किंवा ऑफिस मध्ये वेगवेगळ्या धातूपासून बनवलेलं कासव पाहातो.ते का ठेवावं त्याची दिशा काय असावी या सगळ्या बाबत आज आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो हिंदू धर्मानुसार कासवाला देखील शुभ आणि समृद्ध मानले जाते आणि त्यामुळे तुमच्या व्यवसायात आणि घरात सुख-समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी कासव पाळणे शुभ आहे.फेंगशुई आणि धार्मिक मान्यतांनुसार, आपल्या घरी किंवा कामाच्या ठिकाणी कासव ठेवणे अनेक प्रकारे फायदेशीर आहे.
मित्रांनो कासव पाळल्याने कुटुंबातील सदस्यांवर सकारात्मक परिणाम होतो आणि फेंगशुई शास्त्रानुसार कासव पाळल्याने घरातील लोकांचे आयुष्य वाढते, घरात सुख-शांतीही राहते. तसेच, ते व्यवसायासाठी देखील चांगले आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की घरात कासव ठेवणे तुमच्यासाठी कसे फायदेशीर ठरू शकते. कासवांचा उल्लेख पौराणिक ग्रंथांमध्येही आढळतो.
मित्रांनो घरामध्ये कासवं असल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जिथे कासव असतं तिथे लक्ष्मीचा वास असतो असं मानलं जातं. परंतु त्याचा लाभ तेव्हाच होतो जेव्हा कासवं योग्य दिशेला ठेवला गेल असेल.कासव हा दीर्घकाळ राहणारा शांत प्राणी आहे. नवीन व्यापार सुरू करताना दुकानात,घरात किंवा ऑफिसमध्ये चांदीचा कासवं ठेवणं शुभ मानलं गेलं आहे. आणि यामुळे ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि जीवनात स्थिरता येते.घरातील मंदिरात चांदीचकासव किंवा अष्टधातु पासून बनवलेल्या कासवाचे चित्रही ठेवता येते. कासव पाण्याने भरलेल्या पितळी किंवा अष्टधातूच्या भांड्यात ठेवावे.
मित्रांनो वास्तूनुसार उत्तर दिशा शुभ असते. त्यामुळे उत्तर दिशेलाच कासवाचे चित्र लावावे कारण उत्तर दिशा ही लक्ष्मीजींची दिशा मानली जाते.असे केल्याने धनलाभ आणि शत्रूंचा नाश होतो. घर आणि दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर कासवाचे चित्र लावल्याने धन आणि व्यवसायात यश मिळते. कासव संपत्तीचे सूचक आहे. जर एखाद्याला पैशाशी संबंधित समस्या असतील तर त्याने क्रिस्टल असलेले कासव आणावे आणि फेंगशुईनुसार कासव कधीही तुमच्या बेडरूममध्ये ठेवू नये कारण फेंगशुईनुसार असे करणे हानिकारक असू शकते.
त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. कासव बसवण्याची उत्तम जागा म्हणजे घराची ड्रॉइंग रूम. घरात ठेवलेल्या कासवाचे तोंड घराच्या आत असावे.कासव पाळल्याने घरातील सदस्यांचे आयुष्य ही वाढते कारण कासव हा देखील दीर्घायुषी प्राणी आहे. कासव दीर्घकाळ जगतात आणि नशीबही वाढते, त्यामुळे ते घरी ठेवणं फायदेशीर असतं. मित्रांनो घरात कासव ठेवल्याने शांतता राहते. परस्पर प्रेम वाढते. कासव पाळल्याने त्रास आणि वाईट शक्ती दूर होतात. फेंगशुई शास्त्र सांगते की घरात कासव ठेवल्याने कोणाचेही नुकसान होत नाही, कासव डोळ्यातील दोष दूर करते.
आणि तसेच एखाद्या व्यक्तीचे आरोग्य दीर्घकाळ चांगले नसेल तर कासव आग्नेय दिशेला ठेवावे, ते फायदेशीर आहे. आणि घरामध्ये कासव ठेवल्याने घरातील वातावरण शुद्ध राहते आणि घरात आजार घरात येत नाहीत. आजकाल करिअर, नोकरी आणि व्यवसायात प्रगती करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांसाठी कासव शुभ आहे. जे विद्यार्थी परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करतात त्यांच्यासाठी पितळी कासव यश मिळविण्यासाठी उपयुक्त ठरू शकते, कासवापासून मिळणारी सकारात्मक ऊर्जा खूप प्रभावी आहे.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.