काय आहे स्वामींच्या नैवेद्याचे महत्त्व?

देवपूजा करताना देवाला नैवेद्य अर्पण करणे हा एक महत्त्वाचा संस्कार आहे. आपल्या घरात जे काही गोडधोड पदार्थ बनले असतील ते नैवेद्य म्हणून देवीदेवतांना अर्पण करतो ते नसतील, तर साखर असेल, गूळ असेल, साखरफुटाणे असतील विशेष प्रसंगी खीरसुद्धा बनवली जाते किंवा पुरणपोळीचा नैवेद्यसुद्धा दाखवला जातो. म्हणूनच स्वामींना किंवा इतर कोणत्याही देवीदेवतांना हा नेवैद्य दाखवताना या नेवैद्यासाठी एक छोटेसे ताट असावे, छोटीशी प्लेट असावी आणि ज्याप्रमाणे आपण स्वतः आपले सर्व कुटुंब ताटामध्ये अन्न घेऊन खातो. अगदी देवालासुद्धा नेवैद्य ठेवताना त्याठिकाणी एक छोटेसे ताट नक्की असावे.

स्वामींना किंवा इतर कोणत्याही देवी देवतेला नैवेद्य अर्पण केल्यानंतर एक अत्यंत महत्वाची गोष्ट नक्की आवर्जून करा आपण किंवा आपणच नव्हे तर कुटुंबातील प्रत्येकाने या गोष्टीचे पालन केले तर तो जो भोग आपण देवी देवतांना अर्पण करत आहोत, भोग म्हणजे तो नेवैद्य देवी देवतांनपर्यंत पोहचतो. त्याचे फळ आपल्याला मिळते. अनेकजण देवाला नैवेद्य अर्पण करताना मीठसुद्धा ठेवतात, तर अशी चूक करू नका. कारण हिंदूधर्म शास्त्रानुसार देवाच्या नैवेद्य ताटात मीठ कधीही ठेवू नये.

तसेच या पदार्थांमध्ये आपण कांदा आणि लसूण यांचा वापर केला आहे. किंवा कांदा व लसूण घालून पदार्थ बनविले आहेत. असे पदार्थसुद्धा भोग म्हणून नैवेद्य म्हणून देवपुजेमध्ये त्याचा वापर कदापिही करू नये आणि जर तुम्ही जर व्रत उपवास करत असाल तर तुम्ही स्वतः कांदा, लसूण या पदार्थापासून दूर राहा. मासांहारीसुद्धा वर्ज्य आहे. कांदा लसूणसुद्धा शक्यतो टाळा. कारण आपण जे व्रत,उपवास करतो, तेव्हा त्या विशिष्ट देवतेची उपासना करण्यासाठी तिच्या मंत्राचा, नामाचा जप करतो. तिची उपासना करताना शरीर सात्विक असणे, मन सात्विक असणे व मनाची एकाग्रता असणे फार महत्त्वाचे असते.

मित्रांनो, देवीदेवतांना नेवैद्य दाखवल्यावर, अनेकजण तो नेवैद्य लगोलग ग्रहण करतात. लगेच खातात. आपण देवाला आधी नैवेद्य दाखविला आहे की नाही, तो थोडावेळ त्या ठिकाणी तसाच असू द्या. देवीदेवतांना ग्रहण करू द्या. देवपूजा संपन्न झाल्यावर, मग आपण थोडया वेळाने स्वतःहा ग्रहण करा व घरातील सर्वांना प्रसाद म्हणून वाटा. सर्वांना प्रसाद खाण्यास द्यावा. त्यामुळे कुटुंबांमध्ये जिव्हाळा निर्माण होतो, कुटुंबांत प्रेम वाढीस लागते. जर तुमच्या घरात सतत कटकटी, भांडणे होत असतील तर हा छोटासा उपाय करून पाहा.

मित्रांनो देवपूजेची वेळ ही ठराविकच असावी आणि दररोज विशिष्ट वेळेतच देवपूजा करायला हवी कारण मित्रांनो, देवपुजेस मुहूर्त पाहण्याची गरज नाही. देवपूजा कधीही करू शकता मात्र ज्याप्रकारे आपल्याला आपले जेवण अगदी वेळच्यावेळी लागते. अगदी त्याप्रकारे देवपूजादेखील वेळोवेळी केली तर त्याचे फळ आपणास निश्चितच मिळते. ज्यांना शक्य असेल त्यांनी पहाटे लवकर उठून देवपूजा करा. कारण पहाटे केलेली पूजा ही सर्वश्रेष्ठ मानलेली आहे.

कारण यावेळी आजूबाजूचे वातावरण शांत आणि प्रसन्न असते. आणि ज्या घरात देवीदेवतांचे मंत्र उच्चारताना जे स्वर गुंजतात. आणि तिचा आवाज संपूर्ण वास्तूमध्ये गुंजतो त्या घरात नकारात्मक शक्ती नावालाही उरत नाही. तसेच क्लेश, असमाधान, अशांती, वाद भांडणतंटे या सर्व नकारात्मक गोष्टी निघून जातात. तुम्हाला पहाटे जर देवपूजा करणे शक्य नसेल तर कमीतकमी सकाळच्या प्रसन्नतेवेळी तरी, ही पूजा करायला हवी.

यामुळे नक्कीच आपल्याला स्वामींचे अनेक आशीर्वाद मिळतील. तसेच स्वामी समर्थाना भगव्या रंगाची फुले खूप प्रिय होती. त्यामुळे आपण पूजा करताना स्वामी समर्थाना भगवी फुले अर्पण करावी. तसेच स्वामीना खाण्यामध्ये पुरण पोळी, बेसनाचे लाडू, तसेच खीर, आणि अनेक प्रकारच्या भाज्या या अतिशय प्रिय होत्या. त्यामुळे आपण स्वामी समर्थाना पूजा करताना प्रसाद म्हणून गोड काही तरी किंवा दूध ठेवावे आणि स्वामीची मनोभावे पूजा करावी यामुळे स्वामी आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतात.

Leave a Comment