सध्याच्या काळात अनेकांची डोकेदुखीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दररोज स्क्रिन समोर असणं, मोबाईलचा अतिवापर, बदलते हवामान, पावसात भिजल्यामुळे अशा अनेक कारणांमुळे डोकेदुखीची समस्या वाढत आहे. डोकेदुखीमुळे लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण होते. त्यामुळे डोकेदुखीचा हा त्रास कमी करण्यासाठी लोक अनेक वेगवेगळे उपाय करत असतात. तसंच बहुतेक लोक हे डोकेदुखी थांबण्यासाठी घरगुती उपाय करायचं बगतात. तर आता आपण आपल्या आजीचे काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत जे डोकेदुखी थांबण्यास मदत करतील.
जेव्हा तुमचं डोकं खूप जोरात दुखत असेल तर अशावेळी थंड पाण्याने अंघोळ करा. अंघोळ केल्यानंतर तुमचे कपडेही बदला. यामुळे तुम्हाला फ्रेश राहण्यास मदत होईल.
तसेच तुमच्या आवडीचं हेअर ऑइल घ्या आणि ते थोडं गरम करून घ्या. या हेअर ऑइलने तुमच्या डोक्यात हलक्या हातांनी मसाज करुन घ्या किंवा दुसर्या व्यक्तीकडून तेलाने मसाज करुन घ्या. यामुळे तुम्हाला आराम मिळेल आणि डोकं शांत होण्यास मदत होईल.
ज्यावेळी महिला त्यांच्या केसांना तेल लावतील त्यावेळी केस घट्ट बांधू नये. सोबतच डोकं दुखत असेल त्यावेळेस विश्रांती आवर्जून घ्या आणि फोनचा जास्त वापर करू नका.
ज्यावेळेस डोकं खूप दुखत असेल त्यावेळी तुळस आणि मधाचं पेय घ्या. यासाठी सगळ्यात आधी तुळशीची पाने स्वच्छ धुवून घ्या. ती पाने आणि मध गरम पाण्यात मिक्स करा. त्यानंतर हे पाणी कोमट झाल्यानंतर ते प्या. यामुळे तुमची डोकेदुखी कमी होण्यास खूप मदत होईल.