यावर्षी किती असणार श्रावणी सोमवार? कधीपासून सुरू होणार श्रावण सोमवार? 19 वर्षानंतर आलेला हा योग!

मित्रांनो आपले हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण उत्सव अगदी आनंदाने आपण साजरे करत असतो. आपापसातील मतभेद विसरून आपण एकोप्याने प्रत्येक सणांमध्ये सामील होत असतो आणि एकमेकां बाबतीत आदर भावना तसेच प्रेमाची भावना वाढीस कशी लागेल याचा प्रयत्न करीत असतो. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना देखील खूपच पवित्र महिना मानला गेलेला आहे.

श्रावण महिन्यामध्ये विधिवत पूजा, दानधर्म यांना विशेष असे महत्त्व आहे. श्रावण महिन्यामध्ये अनेक लोक हे भगवान शंकरांचे व्रत उपवास ठेवतात. तसेच आपल्या अडचणी दूर व्हावे त्यासाठी मनोमन प्रार्थना देखील करीत असतात. अनेक भक्त भगवान शिव शंकरांच्या मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन देखील घेत असतात आणि त्यांना अभिषेक देखील करीत असतात.

तर यावर्षी श्रावण महिना हा कधी सुरू होणार आहे आणि किती या वेळेस श्रावण सोमवार आहेत ?त्याविषयी आज आपण जाणून घेऊयात. तर यावर्षी श्रावण महिना हा दोन महिन्यांचा असणार आहे. कारण 18 जुलैला श्रावण महिना चालू होणार आहे. यामध्ये अधिक श्रावण आणि निज श्रावण असे दोन महिने श्रावणाचे असणार आहेत.

तर 18 जुलैपासून श्रावण महिना चालू होऊन तो 15 सप्टेंबर पर्यंत असणार आहे. यावर्षी अधिक श्रावण आल्याकारणाने एक महिना अधिक श्रावणाचा असणार आहे. 19 वर्षानंतर हा योग जुळून आलेला आहे. तर यावर्षी श्रावण सोमवार किती असणार आहेत ?तर यावर्षी श्रावण सोमवार हे सात असणार आहेत.

बरेच जण आपणाला आठ, पाच असे श्रावण सोमवार आहेत असे म्हणतील. परंतु यावर्षी सात श्रावणी सोमवार असणार आहेत. अधिक श्रावण आणि श्रावण असे दोन महिने आल्याकारणाने यावर्षी सात श्रावण सोमवार असणार आहेत. तर तुम्ही देखील या श्रावण महिन्यामध्ये जेवढे आपल्या हातून पुण्य होईल तेवढे पुण्य करायचे आहे आणि भगवान शंकरांचा कृपा आशीर्वाद आपल्याला कसा भेटेल यासाठी प्रयत्न करायचे आहेत.

तसेच पूजा विधी, दान हे देखील तुम्ही अवश्य करायचे आहे. तर येणाऱ्या या श्रावण महिन्याच्या पवित्र महिन्याला तुम्ही देखील आपल्या जीवनामध्ये अगदी आनंदाने साजरे करा. त्यामुळे भगवान शंकरांचा कृपा आशिर्वाद देखील तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल.

Leave a Comment