वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी उदय आणि अस्त होतात, ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो. अशातच आता बुद्धी आणि व्यवसायाचा दाता बुध ग्रहाचा कर्क राशीत उदय होणार आहे. बुध हा व्यवसाय, बुद्धिमत्ता, तर्कशक्ती, अर्थव्यवस्थेचा कारक मानला जातो. त्यामुळे ११ जुलैला बुध उदय होताच त्याचा या क्षेत्रांवर विशेष प्रभाव दिसणार आहे. तर काही ३ राशी अशा ज्यांना या काळात अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत, ते जाणून घेऊया.
मकर रास
बुध ग्रहाचा उदय तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकतो. कारण बुधचा तुमच्या राशीतून सातव्या स्थानी उदय होणार आहे. तसेच तो सहाव्या आणि नवव्या स्थानाचा स्वामी आहे. त्यामुळे या काळात तुम्ही भाग्यवान होऊ शकता. तुम्हाला कोर्ट केसेसमध्ये यश मिळू शकते. दुसरीकडे, ज्यांचे लग्न झाले आहे, त्यांच्या नात्यात गोडवा येऊ शकतो आणि जीवनसाथीची प्रगती होऊ शकते. तुम्ही कौटुंबिक व्यवसायाशी संबंधित असाल तरी हा काळ तुमच्यासाठी शुभ परिणाम देणारा ठरु शकतो. भागीदारीच्या कामातही तुम्हाला चांगले यश मिळू शकते.
कन्या रास
बुधचा उदय कन्या राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो. कारण तुमच्या राशीतून उत्पन्नाच्या स्थानी बुध ग्रहाचा उदय होणार आहे. तेथे तो लग्न आणि कार्यस्थानाचा स्वामी आहे. त्यामुळे या काळात तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. तसेच नोकरी-व्यवसायातही तुमची प्रगती होण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे, जे बेरोजगार आहेत त्यांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. तर व्यावसायिक त्यांचा व्यवसाय वाढवू शकतात.
मिथुन राशी
मिथुन राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचा उदय फायदेशीर ठरू शकतो. कारण तुमच्या गोचर कुंडलीच्या धन स्थानी बुध ग्रहाचा उदय होणार आहे. त्यामुळे तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच, या काळात तुम्ही आर्थिकदृष्ट्या समृद्ध होऊ शकता. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण झाल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. तसेच या काळात तुम्हाला वाहन व मालमत्तेचे सुख मिळू शकते.